समाजसेवेची गुढी अंगी उभारून घराबाहेर पडलेले समाजसुधारक संत गाडगेबाबा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आजची वाटचाल झाली पाहिजे, असे प्रतिपादन नेवासा नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक सागर झावरे यांनी केले. जनसेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या संत गाडगेबाबांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजात अधिकाधिक प्रबोधन होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
सावित्रीबाई फुले फातिमा शेख सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
अंधश्रद्धा झुगारून माणसांत देव शोधण्याचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांनी शिक्षण, स्वच्छता, आरोग्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर आपल्या प्रभावी वाणीमधून समाजाला दिशा दिली, असे मत नगरसेवक राजू काळे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास नगरसेवक संभाजी धोत्रे, सामाजिक कार्यकर्ते धनु काळे, जालु गवळी, दिनेश व्यवहारे, बाबासाहेब लष्करे, डॉ. राहुल चव्हाण, हर्षल चव्हाण, यश चव्हाण आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत व सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास चव्हाण यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. राहुल चव्हाण यांनी मानले.
गाडगेबाबांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजात अधिकाधिक प्रबोधन होणे ही काळाची गरज-सागर झावरे
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6
°
C
29.6
°
29.6
°
70 %
6.1kmh
88 %
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
30
°
Sat
29
°

