spot_img
spot_img
Homeचालू घडामोडीवाढदिवसाचा अनोखा उपक्रम : नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धामोरीच्या विद्यार्थ्यांना...

वाढदिवसाचा अनोखा उपक्रम : नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धामोरीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची भेट!

विद्यार्थी व पालकांनी नामदार विखे पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने गावाचा वतीने दिल्या शुभेच्छा


नेवासा (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा तालुक्यातील धामोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशन तसेच लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याच्या संकल्पनेला मूर्त रूप देत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल व इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत शैक्षणिक प्रगतीसाठी अधिक मेहनत घेण्याचा निर्धार व्यक्त केला.


कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक पवार सर, राहिज सर तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार मिळावा आणि शिक्षणाची गोडी वाढावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.


या प्रसंगी डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे सचिव आदिनाथ पटारे, ज्येष्ठ कार्यकर्ते कडुबाळ पटारे, युवा कार्यकर्ते विठ्ठल पटारे, अजित पटारे, संतोष दाणे, महेश आढगळे, सागर दाणे, अनिल गाडे, दत्ता आढगळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक व शिक्षकांनी कौतुक केले.

वाढदिवसाच्या निमित्ताने समाजोपयोगी कार्य करण्याची परंपरा अधिक बळकट करणारा हा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!