spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedगोळीबार आरोप प्रकरणी एडवोकेट संजय सुखदान यांना न्यायालयाचाअंतरिम दिलासा...

गोळीबार आरोप प्रकरणी एडवोकेट संजय सुखदान यांना न्यायालयाचाअंतरिम दिलासा…

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची तडकाफडकी बदली …

नेवासा


नेवासा प्रतिनिधी : नेवासा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांवर गोळीबार केल्याच्या आरोपप्रकरणी संजय लक्ष्मण सुखदान यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने तात्पुरता दिलासा देत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता त्या तारखेकडे लागले आहे.


दोन दिवसांपूर्वी नेवासा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी उपनगराध्यक्षा सौ. शालिनीताई सुखदान यांचे पती संजय सुखदान यांच्याविरोधात गोळीबार केल्याचा गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांतही या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली होती.


दरम्यान, हा गुन्हा खोटा असून राजकीय सूडातून दाखल करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिक, व्यापारी व विविध संघटनांनी केला. या पार्श्वभूमीवर नेवासा शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत निषेध नोंदविण्यात आला होता. शहरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली.


या घडामोडींनंतर संजय सुखदान यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सोमवारी पहिली सुनावणी झाली. आरोपींच्या वतीने अॅड. अण्णासाहेब आंबाडे यांनी जोरदार युक्तिवाद मांडला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने संजय सुखदान यांना अंतरिम जामीन मंजूर केला.

या पार्श्वभूमीवर आज पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची तडका फडकी बदली झाली व सागर ढिकले यांची नेवासा पोलीस ठाण्यात नेमणूक झाली आहे


आता या संवेदनशील प्रकरणातील पुढील न्यायालयीन प्रक्रिया, तपासाची दिशा, राजकीय पडसाद आणि सत्य कोणत्या वळणावर उभे राहणार याकडे नेवासा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!