spot_img
spot_img
Homeअध्यात्मिकसदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमामध्ये अखंड हरिनाम सप्ताहास धर्म ध्वजारोहणाने प्रारंभ

सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमामध्ये अखंड हरिनाम सप्ताहास धर्म ध्वजारोहणाने प्रारंभ

सोहळ्याचे सलग अकरावे वर्ष

नेवासा(प्रतिनिधी)श्री सदगुरु ब्रम्हलिन नारायणगिरीजी महाराज यांच्या  स्मृती प्रित्यर्थ नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर गुरुवर्य वाणीभूषण महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांनी स्थापित केलेल्या सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमामध्ये मंगळवार दि.२१ एप्रिल रोजी संत महंतांच्या उपस्थितीत व वेदमंत्राच्या जयघोष करत सकाळी धर्म ध्वजारोहण करून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व  अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.दि.२८ एप्रिल पर्यंत हा सोहळा चालणार आहे


   यावेळी झालेल्या धर्म ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी
सोहळयाचे प्रमुख मार्गदर्शक महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर,श्रीराम साधना आश्रमाचे महंत स्वामी सुनीलगिरीजी महाराज,त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज,मध्यमेश्वर देवस्थानचे महंत श्री ऋषिनाथजी महाराज,हभप विश्वनाथ महाराज मंडलिक, बहिरा जातवेद संस्थानचे महंत बालब्रम्हचारी श्री विश्वनाथजी महाराज,संत तुकाराम महाराज देवस्थानचे विश्वस्त भागवत कथाकार अंकुश महाराज जगताप यांच्या हस्ते कलश पूजन,ग्रंथ पूजन,सदगुरू नारायणगिरी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन वेदमंत्राच्या जयघोषात करण्यात आले.वेदशास्त्रसंपन्न युवा पुरोहित निखिलगुरू जोशी यांनी धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य केले.


        यावेळी सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी संत महंतांचे स्वागत व संतपूजन गुरुवर्य श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या हस्ते करण्यात आले.उपस्थित संत महंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सोहळयाला आपल्या भाषणातून शुभाशीर्वाद दिले.यावेळी सोहळयानिमित्ताने
नेवासा बुद्रुक येथून आलेल्या पायी दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले.


                यावेळी झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी पारायण व्यासपीठ प्रमुख रामनाथ महाराज पवार,अशोक महाराज निरफळ, कोंडीराम महाराज पेचे,काकासाहेब शिंदे,शंकरराव लोखंडे,उदयकुमार बल्लाळ,जयवंत देवचक्के,माजी सरपंच अण्णाभाऊ पेचे,प्रकाश सोनटक्के,भानुदास रेडे, इंजिनिअर सुनीलराव वाघ,सुरेशनगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ,नामदेवराव शिंदे,ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव शिंदे,प्रा.रमेश शिंदे,अण्णासाहेब पटारे,योगेश म्हस्के यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संतसेवक बाळासाहेब झिने सर यांनी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक यांनी उपस्थित संत मंडळींसह भाविकांचे आभार मानले.


      सलग आठ दिवस चालणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहाटे ४ ते ६ काकडा भजन,सकाळी ७ वाजता स्तोत्रपठण व श्रींची आरती, सकाळी ८ ते १२ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १२ ते २ भोजनप्रसाद, दुपारी ४ ते ५ प्रवचन,सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, सायंकाळी ७ ते ९ यावेळेत होणाऱ्या कीर्तन  महोत्सवात नामवंत महाराज मंडळींची किर्तन तदनंतर महाप्रसाद असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे.


   सदगुरू नारायणगिरी महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील पारायण सोहळयात होणाऱ्या पारायणाचा व रात्री होणाऱ्या किर्तन महोत्सवातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर व भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे

:

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!