spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedशेताचा बांध व सरकारी खुणा नष्ट केल्याप्रकरणी संदीप ढगे यांच्यावर कारवाई

शेताचा बांध व सरकारी खुणा नष्ट केल्याप्रकरणी संदीप ढगे यांच्यावर कारवाई


नेवासा

: तालुक्यातील खेडले काजळी येथील शेतकरी संदीप महादेव ढगे यांनी शेताच्या हद्दीवरील जुना बांध तसेच सरकारी सीमाखुणा जेसीबीच्या साहाय्याने नष्ट केल्याप्रकरणी तहसील प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संदीप ढगे यांनी वडिलोपार्जित निश्चित केलेल्या शेतबांधावरील सरकारी खुणा हटवून बांध उद्ध्वस्त केला. यावेळी बांधावर असलेली तीन लिंबाची झाडेदेखील जेसीबीने तोडण्यात आली. या प्रकाराची दखल घेत नेवासा तहसीलदार तथा दंडाधिकारी यांनी संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला.
सदर प्रकरणात सात दिवसांच्या आत दंडाची रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून, मुदतीत रक्कम न भरल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.


दरम्यान, शेतकरी बांधवांनी परस्पर सहकार्य, सलोखा आणि प्रेमाने राहून वाद टाळावेत, असा गर्भित संदेश तहसील प्रशासनाने या कारवाईतून दिल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!