spot_img
spot_img
Homeराजकारणखुपटी च्या सरपंच पदी पुन्हा एकदा गोरक्षनाथ तनपुरे

खुपटी च्या सरपंच पदी पुन्हा एकदा गोरक्षनाथ तनपुरे

खुपटी सरपंचपदाची पोटनिवडणूक रंगात; चुरशीच्या तिरंगी लढतीत गोरक्षनाथ तनपुरे १८८ मतांनी विजयी


नेवासे

तालुक्यातील राजकीयदृष्ट्या सजग आणि शहरालगत असलेल्या खुपटी गावातील सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत अखेर तिरंगी लढतीनंतर गोरक्षनाथ फक्कडराव तनपुरे यांनी १८८ मतांनी दणदणीत विजय मिळविला. त्यामुळे गावाच्या राजकारणात पुन्हा एकदा तनपुरे यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.


माजी सरपंच दत्तात्रेय वरुडे यांनी ६ सप्टेंबर २०२४ रोजी पदाचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक लागली होती. विशेष म्हणजे स्वतः वरुडे यांनीही पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत उत्सुकता निर्माण झाली होती. सुरुवातीला तब्बल १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने बहुरंगी लढतीची चर्चा होती. मात्र अर्ज माघारीनंतर अखेर तीन उमेदवार रिंगणात राहिल्याने तिरंगी सामना रंगला.


या निवडणुकीत गोरक्षनाथ फक्कडराव तनपुरे यांना ९११ मते मिळाली, तर भीमराज कार्ले यांना ७२३ मते मिळाली. संगीता चौधरी यांना १० मते पडली. तनपुरे यांनी कार्ले यांचा १८८ मतांनी पराभव करत विजय संपादन केला.


निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कृषी अधिकारी एस. व्ही. जाधव यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांना स्थानिक शिंदे भाऊसाहेब यांनी सहकार्य केले.


विशेष म्हणजे मागील पंचवार्षिक काळातही गोरक्षनाथ तनपुरे हे लोकनियुक्त सरपंच होते. त्यानंतरच्या निवडीत दत्तात्रय वरुडे हे बिनविरोध सरपंच झाले होते. आता पुन्हा एकदा जनतेच्या कौलावर तनपुरे यांनी सरपंचपद पटकावल्याने त्यांच्या समर्थकांत उत्साहाचे वातावरण आहे.

तनपुरे यांच्या प्रचाराची धुरा माजी सरपंच सुरेशराव कार्ले, माऊली कार्ले व सोपानराव शिंदे पाटील यांनी समर्थपणे सांभाळली होती.
तहसील कार्यालयापासून श्री खोलेश्वर गणपती मंदिर ते खुपटी रोडदरम्यान गोरक्षनाथ तनपुरे यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोषात विजयी मिरवणूक काढली.


या उत्साही मिरवणुकीत अशोक चौधरी, माऊली कार्ले, मारुती वरूडे, सुरेश कार्ले ,सचिन शिंदे, अशोक बर्डे, दिगंबरराव कार्ले, अमोल वाकचौरे, कुंडलिक गव्हाणे, सनी शिंदे, भानुदास चौधरी, प्रकाश कार्ले, कैलास गोरे, सुनील गव्हाणे, दिगंबर कडू, सोपानराव पाटील, विष्ण शिर्के, किशोर कुहे, दत्तूनाना गव्हाणे, चांगदेव वरुडे, नरेंद्र नेव्हल, एकनाथ नेव्हल, पाराजी शिंदे, आदी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!