spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedकेंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा ---- प्रवीण कोगंटीवार

केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा —- प्रवीण कोगंटीवार


नेवासा

— जिल्हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (महाराष्ट्र शासन) आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अहिल्यानगर आयोजित केंद्र व राज्य शासन तसेच महामंडळाच्या सर्व योजनांचा प्रचार आणि प्रसार कार्यशाळेचे नुकतेच आयोजन अहिल्यानगर येथे करण्यात आले होते

याप्रसंगी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन अहिल्यानगरचे सहाय्यक आयुक्त प्रवीण कोगटीवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले

यावेळी विविध महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्राचे आयटीआयचे विविध प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी हजर होते
जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रकल्प अधिकारी दौंड मॅडम यांनी उपस्थिताना जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध प्रकल्पाविषयी माहिती पूर्ण मार्गदर्शन केले

महात्मा फुले मागासवर्गीय विकास आर्थिक विकास महामंडळ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ वसंतराव नाईक भटके विमुक्त जाती जमाती महामंडळ, संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ अशा सर्व महामंडळाच्या योजनांची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली


या कार्यक्रम प्रसंगी आयटीआयचे प्राचार्य जहागीरदार सर साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संजय आरणे महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळा चे भांबळ साहेब संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळाचे राजकारण प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेचे प्राचार्य भोसले सर धनसंपदा संस्था अहिल्यानगरच्या वहाडने मॅडम ओबीसी आर्थिक विकास महामंडळ अहिल्यानगरचे भोसले सर प्रहार करिअर अकॅडमी चे संचालक आणि प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विनोद परदेशी सर जिल्हा खादी ग्रामोद्योग से नांगरे साहेब जिल्हा खादी ग्रामोद्योग अकोला चेअरमन शेलार मॅडम वसंत गर्जे पाथर्डी विनायक ससाने श्रीगोंदा आदि प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते


कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सालबर्डी चित्रपटाच्या यशस्वी ते साठी आणि कला भूषण पुरस्कार आणि समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल चित्रपटाचे संजय वैरागर आणि प्रकाश काळोखे यांचा विशेष सन्मान करण्यात आला

विविध कोर्सेस पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वाटप यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी अनेक लाभार्थ्यांनी शासकीय योजना बद्दल माहिती घेऊन त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या यावेळी माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांनी याबाबत आपण पाठपुरावा करण्यात असल्याचे सांगितले


या कार्यक्रमासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संजय आरणे यांनी आयोजन आणि प्रास्ताविककेले या कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना संतोष ससाने यांनी मांडली व त्यास अनुमोदन नितीन साळवे यांनी दिले कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन संजय वैरागर यांनी केले

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
scattered clouds
39.3 ° C
39.3 °
39.3 °
26 %
4.7kmh
32 %
Sun
39 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
36 °
Thu
38 °

Most Popular

error: Content is protected !!