नेवासा
जिल्हा प्रॅक्टिशनर वकील बार असोशियनच्या अध्यक्षपदी अॅड. किशोर ढोरे तर अॅड. अरविंद काळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
मागील महिन्यात नेवासा येथील जिल्हा प्रॅक्टिशनर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. राजेंद्र खिळदकर यांनी नूतन कार्यकरणी निवड प्रक्रियेसाठी नोटीस जाहीर करून निवड प्रक्रिया वेळापत्रक दिले होते
त्यानुसार अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचबरोबर इतर पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज भरले होते. त्यामधून अध्यक्षपदी अॅड. किशोर ढेरे उपाध्यक्षपदी अॅड. अरविंद काळे महिला उपाध्यक्षपदी अॅड. अंजली काळे, सचिवपदी अॅड. सचिन सोनवणे, सहसचिवपदी अॅड.विशाल सुरडे, खजिनदारपदी अॅड. शिवाजी शिंदे तर विश्वस्तपदी अॅड. भरत वर्मा, अॅड. संजय माकोने. अॅड. नामदेव वाघ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
निवड होताच अॅड. नंदकुमार लोंढे, अॅड. बाळासाहेब शिंदे, अॅड. आण्णासाहेब आंबाडे, अॅड. बाळासाहेब गरड, अॅड. योगेश वाघाडे, अॅड. विशाल शिंदे, अॅड. अनिल आगळे आदींनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले

