spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedत्रिमूर्तीचे सचिव मनीष घाडगे आत्महत्या प्रकरणी अध्यक्ष सुमती घाडगे ,२ मुली व...

त्रिमूर्तीचे सचिव मनीष घाडगे आत्महत्या प्रकरणी अध्यक्ष सुमती घाडगे ,२ मुली व जावई यांच्यासह सह सहा जणांवर गुन्हा दाखल….

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेतील अंतर्गत वाद आणि मालमत्ता वाद ठरला सचिव मनीष घाडगे यांच्या आत्महत्येचे कारण….

नेवासे


त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष घाडगेपाटील आत्महत्येप्रकरणी पत्नीने केला अध्यक्षांसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे

मनीष घाडगे यांनी मोबाईल कव्हर मध्ये ठेवलेली चिट्ठी पोलिसांकडून जप्त


राज्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या सचिव मनीष घाडगेपाटील यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी संस्थेच्या अध्यक्षांसह सहा जणांविरोधात मनीष घाडगे यांची पत्नी मनीषा घाडगे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर आणि संतापजनक घटनेमुळे राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मनीष घाडगे यांनी लिहिलेली आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे.
चिठ्ठीत सुमती घाडगे व इतरांकडून मानसिक त्रास होत असल्याचे नमूद करत आपल्या मुले संस्थेत विश्वस्त राहतील अशी इच्छा व्यक्त केली आहे.


ऑक्टोबर २०२५ पासून मनीष घाडगेपाटील यांच्यावर संस्थेच्या सचिवपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला जात होता. तसेच त्यांच्या नावावर असलेली वैयक्तिक मालमत्ता संस्थेच्या नावे करण्यासाठीही वारंवार मानसिक छळ करण्यात येत होता. राजीनामा न दिल्यास खोट्या गुन्ह्यांत अडकवून बदनामी करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून २८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.


या प्रकरणी मनीष घाडगे यांच्या पत्नी मनीषा घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचे अध्यक्ष सुमती साहेबराव घाडगेपाटील, त्यांची मुलगी स्नेहल साहेबराव घाडगे, दुसरी मुलगी श्रुती साहेबराव घाडगे, घाडगे यांचे जावई चेतन चव्हाण, प्राचार्य सोपान बाजीराव काळे आणि संस्थेच्या समन्वयक अनुराधा उत्तम गोरे या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी मनीषा घाडगे यांनी फिर्यादीमध्ये आरोप केले आहेत की आहे की, त्यांच्या पतीला पदाचा राजीनामा देण्यासाठी आणि मनीष गाडगे यांनी त्यांची स्वतःची मालमत्ता संस्थेचे नावे करून द्यावी यासाठी म्हणजेच संपत्ती बळकावण्यासाठी आरोपींकडून सातत्याने खोट्या गुन्ह्यांच्या आणि बदनामी करू अशा धमक्या देण्यात येत होत्या. या मानसिक छळामुळे त्यांनी आत्महत्या केली.


या आत्महत्या प्रकरणाचे पडसाद जिल्ह्या सह राज्याच्या शैक्षणिक वर्तुळ मध्ये उमटले आहेत संस्थेचे संस्थापक साहेबराव गाडगे यांचे निधनानंतर संस्थे मधील अंतर्गत वाद वाढले व त्यातून सचिव मनीष घाडगे यांना टार्गेट करीत मानसिक छळ केला गेला त्याची परिमिती आत्महत्या झाल्यामुळे या प्रकरणाला गंभीर व कायदेशीर वळण लागले असल्याचे दिसत आहे, तसेच दोषींवर तातडीने कठोर कारवाईची जोरदार मागणी होत आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
39.3 ° C
39.3 °
39.3 °
12 %
2.9kmh
0 %
Mon
38 °
Tue
40 °
Wed
41 °
Thu
42 °
Fri
41 °

Most Popular

error: Content is protected !!