spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedशहर व परिसराच्या उन्नतीसाठीच नेवासा बाजार समितीमध्ये खुला कांदा खरेदी विक्री चा...

शहर व परिसराच्या उन्नतीसाठीच नेवासा बाजार समितीमध्ये खुला कांदा खरेदी विक्री चा शुभारंभ- माजी मंत्री शंकरराव गडाख

पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

नेवासा
— परिसराची उन्नती व, शेतकऱ्यांचे हितासाठीच खुला कांदा खरेदी विक्री सुरू केली आहे असे प्रतिपादन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

नेवासा बाजार समितीच्या खुल्या कांदा बाजाराचा शुभारंभ बुधवारी महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर, ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के आणि शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती नंदकुमार पाटील यांनी केले.

शंकरराव गडाख पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या संघर्षाच्या काळात मी नेहमी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो असून प्रसंगी आंदोलन व कैदही स्वीकारली आहे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असताना गोणी भरण्याचा खर्च वाचवून जवळच विक्रीची सोय उपलब्ध होणे ही मोठी दिलासा देणारी बाब आहे. खुल्या कांदा बाजारामुळे नेवासा शहर व परिसराच्या अर्थकारणाला चालना मिळणार असून शेतकऱ्यांची वाहतूक व वेळेची बचत होऊन गैरसोय दूर होणार आहे.

घोडेगाव येथे 24 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या कांदा बाजाराला आज राज्यात मानाचे स्थान मिळाले आहे. त्याच धर्तीवर नेवासा येथेही व्यापाऱ्यांशी संवाद साधून अभ्यासपूर्वक हा बाजार सुरू करण्यात आला असून घोडेगावप्रमाणेच येथेही प्रामाणिक व्यवहार व्हावेत, कारण बाजार विश्वासावर चालतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी देविदास महाराज म्हस्के म्हणाले, संतांनी कार्यामध्ये देव शोधला असून शेतकऱ्यांच्या श्रमाला यश मिळवून देणारा हा उपक्रम दिशादर्शक ठरेल.

महंत उद्धव महाराज मंडलिक यांनीही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल व शेतीकडे वळणाऱ्या तरुणांना याचा लाभ होऊन परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

एडवोकेट देसाई आबा देशमुख, माजी आमदार पांडुरंग अभंग आणि शेतकरी नेते आंबादास कोरडे यांनीही मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या

कार्यक्रमास पांडुरंग अभंग, अॅड. आबा देशमुख, आंबादास कोरडे, डॉ. शिवाजी शिंदे, दत्तात्रय काळे, तुकाराम शेंडे, कडूबाळ कर्डीले, काकासाहेब शिंदे, उपसभापती नानासाहेब नवथर, रामभाऊ जगताप, भाऊसाहेब मोटे रामभाऊ जगताप,भाऊसाहेब मोटे,श्रीरंग हारदे,तुकाराम मिसाळ,दिलीपराव पवार,एकनाथ धानापुणे ,अजित मुरकुटे,गोरक्षनाथ तनपुरे,माऊली कार्ले,संजय सुखधान, जितेंद्र कु-हे,प्रभाकर कोलते,बाळासाहेब गोरे,नवनाथ पठाडे,कृष्णा शिंदे,बाळासाहेब शिंदे, महेश शिंदे, सतीश पटारे,अशोक हारदे,संजय आहेर,अभिजीत लुनीया,भाऊसाहेब कांगुणे, बाबासाहेब जगताप,वैभव नवले,बाबा घुले, सतीश पिंपळे,हिरालाल धनवडे, नागेश आघाव,बाळासाहेब परदेशी,पांडुरंग निपुंगे,बाबासाहेब भणगे,शिवाजी पाठक, डॉ संतोष फुलारी, बाबासाहेब रोटे,पोपट सरोदे,अरुण निपुंगे, बाळासाहेब तनपुरे,विठ्ठल नाबदे,सोपान पंडित,भगवान काळे,दिगंबर वरखडे,साहेबराव पवार,सुदर्शन वाकचौरे,भानाभाऊ चौधरी,कैलास जाधव,शशिकांत मतकर, काकासाहेब गायके,निलेश पाटील,नारायण लोखंडे,संभाजी पवार,दादासाहेब कोकणे,जालु गवळी,संभाजी धोत्रे,दिनेश व्यव्हारे,डॉ राहुल चव्हाण,गणेश चावरे,बाजार समितीचे सर्व संचालक आदींसह नेवासा तालुक्यातील विविध गावांचेयांच्यासह तालुक्यातील सरपंच, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्राध्यापक देविदास साळुंके यांनी केले तर संस्थेचे सचिव पालवे व कर्मचारी शेतकऱ्यांचे तसेच व्यापाऱ्यांचे स्वागत करीत होते

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!