spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedअधिक मासाची भक्तिमय सुरुवात; ज्ञानेश्वर मंदिरात संत पूजन उत्साहात

अधिक मासाची भक्तिमय सुरुवात; ज्ञानेश्वर मंदिरात संत पूजन उत्साहात

नेवासे

अधिक मासानिमित्त येथील ज्ञानेश्वर मंदिर येथे संत पूजन, ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडी पालखी सोहळा आणि वारकरी मेळाव्याने भक्तिमय वातावरणात शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडी पालखी सोहळ्यात सहभागी होणारे विविध दिंडी चालक, परिसरातील कथा-कीर्तनकार तसेच वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ज्ञानेश्वरी पालखी दिंडी सोहळ्यास शासन स्तरावर मान्यता मिळाल्याबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सुविधांसाठी सर्व भारतीय संप्रदायाच्या वतीने शासनाचे आभार मानण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पांडुरंग अभंग होते. त्यांनी उपस्थित दिंडी चालक व वारकऱ्यांचे स्वागत करत मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने संवाद साधला.

या प्रसंगी मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग अभंग साहेब ,विश्वस्त देविदास महाराज म्हस्के, राम महाराज झिंजुर्के यांनी अधिक मासाचे महत्त्व व वारीचे महत्त्व सांगितले

, भगवान महाराजशास्त्री, सेवानाथ महाराज, प्रवीण महाराज कोरडकर आणि नंदकुमार खरात महाराज हे प्रमुख उपस्थित होते मंदिराचे विश्वस्त कैलासराव जाधव यांनी अधिकमासाच्या पहिल्या आमरस पुरणपोळीच्या पंक्तीचे दाते आदिनाथ महाराज भोगे यांनी आभार मानले

संत पूजन, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. अधिक मासाच्या प्रारंभी झालेल्या या सोहळ्यामुळे वारकरी संप्रदायात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Error Ico

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!