spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedवीस वर्षांची परंपरा जपणारा धामोरीतील अखंड हरिनाम सप्ताह....

वीस वर्षांची परंपरा जपणारा धामोरीतील अखंड हरिनाम सप्ताह….

स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरण



नेवासे–आदिनाथ पेटारे याज कडून

: नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगडच्या पूर्व बाजूस प्रवरा नदीकाठी वसलेल्या धार्मिक व आध्यात्मिक परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या धामोरी येथे गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत सात दिवस भजन, कीर्तन, श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण, हरिपाठ, रामकथा प्रवचन, काकडा भजन तसेच सकाळ-सायंकाळ अन्नदान अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला होता. टाळ-मृदुंगाच्या निनादाने संपूर्ण धामोरी परिसर दुमदुमून गेला होता.


परमपूज्य महंत हभप भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैकुंठवासी हभप नाशिकेत महाराज कोरेकर यांच्या कृपाशीर्वादाने सुरू झालेली ही सप्ताह परंपरा ग्रामस्थांनी गेल्या वीस वर्षांपासून अखंडपणे जपली आहे. सप्ताह काळात व्यासपीठ व मृदुंग वादनाची सेवा हभप शशिकांत महाराज कोरेकर, हभप गणेश महाराज तनपुरे, हभप अतुल महाराज पटारे आणि हभप रोहित महाराज पटारे यांनी सांभाळली. तसेच हभप ज्ञानेश्वर माऊली हजारे, हभप अंकुश महाराज जगताप, हभप रमेशानंद गिरी महाराज, हभप सागर महाराज टेमक व हभप हनुमंत महाराज वैष्णव सेवा आश्रम यांच्या कीर्तन सेवेमुळे भाविकांना अध्यात्मिक मेजवानी लाभली.


सप्ताहाची सांगता श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी हभप स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात झाली. यावेळी परमपूज्य स्वामीजींच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. त्यानंतर कचरू पटारे, लक्ष्मण पटारे, गोरक्षनाथ गाडे, दत्तात्रय घोरपडे आणि अविनाश दाणे यांच्या वतीने काला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.


सप्ताहासाठी पोपट वरखडे, दीपक पटारे, पोपट पठाडे, बन्सी पठाडे, आकाश पटारे, अशोक पटारे, मच्छिंद्र दाणे, कडूबाळ पटारे, बाबासाहेब पटारे, उत्तम पटारे, अतुल पटारे, जगन्नाथ पटारे, भारत पटारे, किशोर पटारे, बाळासाहेब पटारे, शांतीलाल वरखडे, सुभाष निपुंगे, अशोक जाधव, किशोर जमदाडे, ज्ञानेश्वर जमदाडे, विष्णू घोरपडे, अरुण गायकवाड, पंढरीनाथ पिंपळे, बबन वरखडे, रावसाहेब पटारे, मच्छिंद्र असणे, रघुनाथ पटारे आणि मच्छिंद्र पटारे यांनी सात दिवस अन्नदान सेवा दिली.


सप्ताह समितीत यादव पटारे, संदीप पटारे, जगन्नाथ महाराज पटारे, ज्ञानेश्वर जमदाडे, चेअरमन नवनाथ पटारे, अशोक जाधव, आदिनाथ पटारे, कैलास पटारे, राम पटारे तसेच देवगड स्वच्छता सेवाधारी महिला मंडळ व पाकशाळा सेवाधारी मंडळ धामोरी यांचे विशेष सहकार्य लाभले.

सप्ताह काळात श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे मठाधिपती हभप देविदास महाराज म्हस्के, आमदार रत्नमालाताई लंघे, युवा नेते ऋषिकेश शेटे, बाळासाहेब कोलते, महेश अण्णा लोखंडे, मनोज अण्णा पारखे, नानासाहेब डौले, सचिन गवांदे, अंकुश मस्के, संदीप सरकाळे आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.



काकडा भजनी मंडळाच्या विनंतीला मान देत आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी विशेष प्रयत्न करून सप्ताह काळात अखंड व भारनियमनमुक्त वीजपुरवठा उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थ व भजनी मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय पटारे व आदिनाथ पटारे यांनी केले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
scattered clouds
39.3 ° C
39.3 °
39.3 °
26 %
4.7kmh
32 %
Sun
39 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
36 °
Thu
38 °

Most Popular

error: Content is protected !!