spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedदेवगड येथे गुरुवार पासून गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांची श्रीमद भागवत कथा...

देवगड येथे गुरुवार पासून गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांची श्रीमद भागवत कथा…

:-
    ….विठ्ठल माझा माझा,माझा,
माझा ….,मी विठ्ठलाचा…
हया भक्तीगीतां साठी प्रसिद्ध राधाकृष्ण महाराज पुन्हा भाविकांच्या मागणीनुसार   पुन्हा देवगड येथे येत असल्याने भाविकांना या कथेची ओढ लागली आहे

नेवासा(प्रतिनिधी)त्रैवार्षिक पुरुषोत्तम मासानिमित्त नेवासा तालुक्यातील भू लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री गुरूदेव दत्त पीठ क्षेत्र देवगड येथे राजस्थान जोधपूर येथील गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून गुरुवार दि.२१ मे पासून श्रीमद भागवत कथा सोहळा सुरू होत आहे.राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वात होणाऱ्या श्रीमद भागवत कथा सोहळयाच्या निमित्ताने किर्तन महोत्सवाचे ही आयोजन करण्यात आले असून या सोहळयाची जय्यत तयारी देवगड येथे सुरू आहे.
      सकाळी ९ ते १२ यावेळेत श्रीमद भागवत कथा होणार असून या निमित्ताने श्री दत्त लक्ष्मी नारायण याग देखील यज्ञ मंडपात होणार आहे.दुपारच्या सत्रात ३.३० ते ५ यावेळेत किर्तन महोत्सव साजरा होत असून यामध्ये देवगडचे विद्यार्थी गणेश महाराज तनपुरे, खलाल पिंपरी येथील शशिकांत महाराज कोरेकर, बहिरवाडी येथील रामनाथ महाराज पवार,लक्ष्मण महाराज नांगरे,आळंदी येथील सुदर्शन महाराज देशमुख यांची किर्तने होणार आहे.
            बुधवार दि.२७ मे रोजी दिंडी मिरवणूक व श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा यांचा पालखी सोहळा साजरा होणार असून गुरुवार दि.२८ मे रोजी राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या सकाळी ८ ते १० या वेळेत होणाऱ्या काल्याच्या किर्तनाने श्रीमद भागवत कथा सोहळा व  किर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे
               श्री क्षेत्र देवगड येथे गोवत्स श्री राधाकृष्ण महाराज यांच्या होणाऱ्या श्रीमद भागवत कथा श्रवणाचा व  होणाऱ्या किर्तन महोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थान देवगड व श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.5 ° C
26.5 °
26.5 °
77 %
5.5kmh
100 %
Wed
27 °
Thu
30 °
Fri
30 °
Sat
31 °
Sun
31 °

Most Popular

error: Content is protected !!