प्रवरा नदीवरील पाणी योजना लाभधारक शेतकऱ्यांचा जलपूजन कार्यक्रम उत्साहात.!
नेवासा
: प्रवरा नदीवरील पाचोगाव, पुनतगाव व भेंडेपर्यंत बंधारा भरून दिल्याबद्दल लोकनेते तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचा आभार व्यक्त करण्यासाठी नेवासा तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीने जलपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. २१ मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजता गणपती घाट (पाकशाळा), नेवासा खुर्द येथे हा कार्यक्रम पार पडणार असून आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या शुभहस्ते जलपूजन करण्यात येणार आहे.
प्रवरा नदीत पाणी उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील शेतीला मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

