spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorized52 वर्षानंतर हे जायकवाडी धरणग्रस्तांचे प्रश्न कायम-- डॉक्टर ढगे

52 वर्षानंतर हे जायकवाडी धरणग्रस्तांचे प्रश्न कायम– डॉक्टर ढगे

तालुक्यात तीन ठिकाणी धरणग्रस्तांच्या महसूल प्रश्नांसाठी बैठका


नेवासा : नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथे मंगळवार दि. २६ मे २०२६ रोजी विठ्ठल मंदिरात जायकवाडी धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. जायकवाडी धरणग्रस्तांचे पुनर्वसन होऊन तब्बल ५२ वर्षे उलटून गेली असली, तरी अनेक मूलभूत प्रश्न अद्याप कायम असून नव्यानेही काही समस्या निर्माण झाल्याची खंत व्यक्त केली


या बैठकीत माजी कुलगुरू डॉ. अशोकराव ढगे यांनी अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना सविस्तर निवेदन सादर करून धरणग्रस्तांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. यावेळी प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी सोनल म्हात्रे व नेवाशाचे नगराध्यक्ष डॉक्टर करण सिंह घुले हे उपस्थित होते

उस्थळ प्रवरा संगम आणि वरखेड येथे धरणग्रस्त महसूल प्रश्न विषयी शासनाने स्वतंत्र बैठका आयोजित केल्या होत्या यावेळी प्रवरासंगम येथे डॉक्टर ढगे यांनी निवेदन दिले विशेषतः जमिनीच्या वर्गीकरणाच्या प्रश्नावर चर्चा करताना अप्पर जिल्हाधिकारी हिंगे यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच जागेवरच विविध महसुली नियमांचा उलगडा करून संबंधित प्रश्न सोडविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.


डॉ. ढगे यांनी जायकवाडी धरण परिसरातील मच्छीमारांचा प्रश्न मांडताना धरणाच्या पाण्यावर चांगल्या जातीचे मत्स्यबीज सोडण्याची मागणी केली. स्मशानभूमीसाठी अधिक निधी उपलब्ध करून द्यावा, धरण परिसरात वाढत चाललेली वृक्षतोड रोखण्यासाठी वन विभागाला गांभीर्याने सूचना कराव्यात, धरणग्रस्त गावांना जोडणारे रस्ते सुस्थितीत करावेत तसेच वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याबाबत महावितरणाला निर्देश द्यावेत, अशा विविध मागण्या त्यांनी प्रशासनासमोर मांडल्या

.
धरणग्रस्त भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी अजूनही संघर्ष करावा लागत असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.


या चर्चासत्रास ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव डावकर, नितीन भालेराव, केशव वाघमारे, मोहिनीराज कदम, दत्तात्रेय आगळे, संतोष कोरडे, भाऊसाहेब चव्हाण, सर्कल कुसमुडे, यांच्यासह प्रवरा संगम, टोका, माळेवाडी, खेडले, काजळी, मंगळापूर आदी .

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
scattered clouds
33 ° C
33 °
33 °
44 %
7.7kmh
44 %
Wed
40 °
Thu
40 °
Fri
40 °
Sat
40 °
Sun
40 °

Most Popular

error: Content is protected !!