spot_img
spot_img
Homeअध्यात्मिकदेवगडात श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा भक्तिरसात रंगलेला सोहळा...

देवगडात श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा भक्तिरसात रंगलेला सोहळा…

राधाकृष्ण महाराजांच्या भागवत कथेला भाविकांची अलोट गर्दी; देवगडात भक्तीचा महापूर


नेवासा

: श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा तथा विष्णू याग सोहळ्यात आज श्रीकृष्ण जन्मोत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

विठ्ठल माझा माझा’ या भक्तिगीतामुळे सर्वदूर प्रसिद्ध असलेले राधाकृष्ण महाराज यांच्या अमोघ वाणीतील भागवत कथेमुळे देवगड परिसरात भक्तीचा महापूर पाहायला मिळत आहे.


देवगड देवस्थानच्या ज्ञानसागर मंडपात झालेल्या या सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. फुलांची उधळण, जयघोष, आकर्षक सजावट आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर हरिनामाने दुमदुमून गेला. माता-भगिनींसह युवक व ज्येष्ठ भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.


राधाकृष्ण महाराज यांची देवगड येथील ही दुसरी भागवत कथा असून, यापूर्वी झालेल्या कथेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्या यशस्वी उपक्रमानंतर यंदाही जिल्हाभरातून हजारो भाविक देवगडमध्ये दाखल होत आहेत. महाराजांच्या रसाळ, ओजस्वी आणि जीवनाला दिशा देणाऱ्या निरूपणामुळे श्रोते मंत्रमुग्ध होत असल्याचे चित्र दररोज पाहायला मिळत आहे.


भागवत कथेबरोबरच विष्णू यागाचे पौरोहित्य गणेश गुरु यांच्या हस्ते पार पडत आहे. पहाटे काकडा आरती, श्रीमद्भगवद्गीता पाठ, हरिपाठ, भजन, हरीकीर्तन आदी कार्यक्रमांमुळे संपूर्ण देवगड नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे.


दरम्यान, प्रसिद्ध निवेदक बजरंग विधाते हे आपल्या प्रभावी शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असून, येत्या गुरुवारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याचा समारोप होणार असल्याची माहिती भास्करगिरी महाराज यांनी दिली.

महाप्रसाद—अन्नदानाचा भव्य उपक्रम; दररोज २५ हजार भाविकांसाठी


▪️ अन्नदानाचा भव्य उपक्रम; दररोज २५ हजार भाविकांसाठी
सोहळ्यात ज्ञान आणि भक्तीच्या यज्ञाबरोबरच अन्नदानाचा महायज्ञही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ‘अन्नपूर्णा प्रसादालया’मध्ये दररोज सकाळ व सायंकाळ मिळून सुमारे २५ हजार भाविकांच्या महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. सेवाधारी मंडळ, स्वयंसेवक आणि विविध समित्यांच्या माध्यमातून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने भोजन व्यवस्था सांभाळली जात असून, आलेल्या प्रत्येक भाविकाला प्रेमाने प्रसाद दिला जात आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
35.2 ° C
35.2 °
35.2 °
32 %
6.6kmh
0 %
Fri
35 °
Sat
40 °
Sun
40 °
Mon
40 °
Tue
37 °

Most Popular

error: Content is protected !!