spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedएकच वादा — वहिनी आणि दादा”च्या घोषणांनी दुमदुमला कुकाणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जनसेवेचा...

एकच वादा — वहिनी आणि दादा”च्या घोषणांनी दुमदुमला कुकाणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जनसेवेचा निर्धार….

स्वर्गीय अजित दादांना श्रद्धांजली अर्पण करत “गोरगरीब जनतेची सेवा हीच खरी श्रद्धांजली” असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.


नेवासा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नेवासा तालुका यांच्या वतीने आयोजित भव्य लाभार्थी मेळावा, गुणवंतांचा सत्कार समारंभ आणि जनसंवाद कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. स्वर्गीय अजित दादांना श्रद्धांजली अर्पण करत “गोरगरीब जनतेची सेवा हीच खरी श्रद्धांजली” असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त कार्यक्रमात विविध गावांतील नागरिक, कार्यकर्ते आणि लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जनतेच्या समस्या थेट जाणून घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा शब्द दिला. “स्वर्गीय अजित दादांनी दिलेली समाजसेवेची प्रेरणा आम्हाला कायम जनतेसाठी झटण्याची ताकद देते,” असे मत अब्दुल भैय्या शेख यांनी व्यक्त केले.


मेळाव्यात विविध क्षेत्रातील गुणवंतांचा जाहीर सत्कार करण्यात आला. रोजगार व स्वयंरोजगार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल News18 लोकमत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सौ. तस्मिया अब्दुल भैय्या शेख यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच फुटबॉलमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणारी ज्ञानेश्वरी रवी रींधे आणि जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या पिंपरी शहाली संघाचाही गौरव करण्यात आला.


कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याची भूमिका मांडली. महिला नेत्या आशाताई बाळासाहेब मुरकुटे यांनी “गोरगरिबांसाठीचा संघर्ष सुरू ठेवा, आम्ही कायम पाठीशी आहोत,” असा विश्वास व्यक्त केला.


तालुका अध्यक्ष अशोकजी मोरे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष विलासराव देशमुख यांनी प्रास्ताविक केले. हाजी हकिमाबी शेख, गायकवाड ताई, युवक अध्यक्ष अभिराज आरगडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर गाडे पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

एकच वादा — वहिनी आणि दादा”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. जनसेवेची नवी ऊर्जा आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले नवचैतन्य हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.


Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!