spot_img
spot_img

एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात पवित्र पैस खांबाची महाआरती उत्साहात

महाआरतीचा मान नेवासा पोलीस स्टेशनचे प्रमुख पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांना

नेवासा : बुधवारी एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात सायंकाळी सहा वाजता पवित्र पैस खांबाची महाआरती मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या महाआरतीस नेवासा पोलीस स्टेशनचे प्रमुख पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या शुभहस्ते पूजा व आरती करण्यात आली. यावेळी पोलीस कर्मचारी अजय साठे, दादा बाबासाहेब वाघमोडे, संजय माने व संदीप बर्डे उपस्थित होते.

महाआरतीनंतर अण्णासाहेब जाधव टेलर यांच्या वतीने सुमारे ३० किलो साबुदाणा खिचडीचा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला. मंदिराचे महंत देवीदास बाबा म्हस्के, विश्वस्त मंडळ तसेच मंदिराचे संपर्क अधिकारी आशिष कावरे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार व स्वागत करण्यात आले.

महंत देवीदास महाराज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली एकादशी निमित्त सुरू करण्यात आलेल्या महाआरती उपक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून माऊली भक्तांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक सागर ढिकले म्हणाले, “आज मंदिरात महाआरती केल्यानंतर मला साक्षात माऊलींचे दर्शन झाल्याची अनुभूती आली. माऊलींनी मला पुढील पोलीस सेवेत कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये, याची जाणीव ठेवून कार्य करण्याचा संदेश दिला.”

तसेच, “माऊलींच्या व वै. गुरुवर्य बनशी महाराज तांबे यांच्या आशीर्वादाने माझ्या संपूर्ण प्रशासकीय सेवेत नागरिकांना सहकार्य व मदत करण्याचा शब्द मी माऊलींना दिला आहे,” असेही त्यांनी सांगितले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!