spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedगुणवंत विद्यार्थ्यांचा नेवासा शाखेत गौरव; मान्यवरांच्या हस्ते सत्कार....

गुणवंत विद्यार्थ्यांचा नेवासा शाखेत गौरव; मान्यवरांच्या हस्ते सत्कार….


नेवासा : नेवासा शाखेच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नेवासा न्यायालयातील सरकारी वकील देवा काळे, नेवासा वकील संघटनेचे अध्यक्ष ठुबे साहेब, एसआरसीसी क्लासेसचे विशाल सर तसेच एरिया डेव्हलपमेंट ऑफिसर एकनाथ नांदे उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या बळावर उच्च ध्येय गाठण्याचा सल्ला दिला. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार हा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाखाधिकारी गणेश वायकर, तेजस दुशिंग, सचिन मुंडे, प्रतिभा पागिरे आणि वैशाली ताठे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व नागरिकांची उपस्थिती लाभली.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!