spot_img
spot_img
Homeसहकारज्ञानेश्वर कारखाना निवडणुकीत स्वतंत्र मतदान केंद्रांची मागणी.....

ज्ञानेश्वर कारखाना निवडणुकीत स्वतंत्र मतदान केंद्रांची मागणी…..



नेवासा

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, भेंडे (ता. नेवासा) यांच्या आगामी निवडणूक कार्यक्रमाबाबत उस उत्पादक सभासदांनी आक्षेप नोंदवत मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याची मागणी केली आहे.


वाकडी येथील उस उत्पादक सभासद अंकुश रंगनाथ काळे यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) संजय गोंदे यांना निवेदन देऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय कारखाना परिसरातील श्री ज्ञानेश्वर कामगार कल्याण केंद्र येथे ठेवण्यात आल्याबाबत आक्षेप घेतला आहे. हे कार्यालय सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, नेवासा येथे स्थलांतरित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.


निवेदनात कारखान्याच्या विद्यमान व्यवस्थापनाकडून निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून मतदारांवर दबाव किंवा दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी निवडणूक प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी, असे म्हटले आहे.


तसेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमात मतदान केंद्रांची माहिती नसल्याचे निदर्शनास आणून देत ज्ञानेश्वर कारखान्याचे कार्यक्षेत्र २१४ गावांमध्ये पसरलेले असल्याने सभासद मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक गटामध्ये स्वतंत्र मतदान केंद्राची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.


उस उत्पादक सभासदांच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा न्याय मिळाला नाही तर या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!