spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedनेवासा येथे अवैध गोमांस व कातडी विक्रीवर पोलिसांचा छापा; दोन आरोपी अटक

नेवासा येथे अवैध गोमांस व कातडी विक्रीवर पोलिसांचा छापा; दोन आरोपी अटक



नेवासा (प्रतिनिधी) : नेवासा शहरातील नाईकवाडी मोहल्ला परिसरात पुन्हा एकदा अवैधरित्या गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांविरोधात नेवासा पोलिसांनी बुधवारी धडक कारवाई करत सुमारे ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यातआली


पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नाईकवाडी मोहल्ल्यातील एका घरावर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान गोवंशाचे मांस तोडून विक्रीसाठी ठेवलेले आढळून आले. पोलिसांनी सुमारे २०० किलो गोमांस व कातडी असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

या प्रकरणी जफर बिलाल चौधरी (वय ३५) व सलीम गणी शेख (वय ४५, दोघे रा. नाईकवाडी मोहल्ला, नेवासा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय कारभारी साठे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम २७१, ३२५ तसेच महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमातील कलम ५, ५(क), ९ व ९(अ) अन्वये नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर ढिकले, सहायक फौजदार नागरगोजे, पोहेकॉ अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल अतुल शेळके, नारायण डमाळे, श्रीनाथ गवळी, सलमान शेख व चालक प्रभाकर पडोळे यांच्या पथकाने केली.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!