spot_img
spot_img
Homeप्रशासनचिलेखनवाडी शिवपाणंद रस्ता मोजणी काम पूर्ण करण्यात भूमीअभिलेखला यश.

चिलेखनवाडी शिवपाणंद रस्ता मोजणी काम पूर्ण करण्यात भूमीअभिलेखला यश.

उपाधिक्षक संदीप गोसावी यांची कामगिरी.

-कुकाणा रिसरातील चिलेखनवाडी या पहिल्या रोड मॉडेल व्हीलेज मधील रस्ते मोजणी अभियानातर्गत चिलेखनवाडी -कुकाणा शिव पाणंद रस्ता पूर्ण पणे मोजणीस आज बुधवारी अखेर यश आले.

या अभियानाचा प्रारंभ भूमी अभिलेख नेवासा उपाधिक्षक संदीप गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला होता. आज बुधवारी सकाळी कुकाणा मंडलाधिकारी तृप्ती साळवे,चिलेखनवाडी सरपंच भाऊसाहेब सावंत चिलेखनवाडी तलाठी प्रियंका चव्हाण, भुकरमापक राहुल शिरसाठ, शिव पाणंद चळवळीचे राज्य अध्यक्ष शरद पवळे उपाध्यक्ष नाथा शिंदे,बाळासाहेब थोरात, अंबादास आव्हाड आदींच्या उपस्थितीत चिलेखनवाडी ते कुकाणा शिव पाणंद रस्ता मोजणी करण्यात आली.

यावेळी संबंधित शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. अशा मोजणीत दोन्ही बाजूचे गट मोजावे लागतात. मोजणी पूर्ण झाल्यानंतर त्याचे रेकॉर्ड तयार करावे लागते. चिलेखनवाडीतील या रस्त्याचे काम रखडले होते मात्र भूमी अभिलेख उपाधीक्षकसंदीप गोसावी यांना ग्रामपंचायत व ग्रामस्थानी मागणी केल्या नंतर या मोजणीला आज अखेर यश आले.

नेवासा भूमी अभिलेख कार्यालयाकडून रस्ते मोजणी अभियान कामे तालुक्यात प्रगतीपथावर असून चिलेखनवाडीत त्यास यश आल्याचे शेत व शिव पाणंद रस्ते चळवळ अभियानाचे नाथा शिंदे यांनी सांगितले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!