नेवासा बस स्थानकावरील गर्दी कमी होणार….
नेवासा प्रतिनिधी
सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा काळ सुरू असल्याने नेवासा ते अहिल्यानगर मार्गावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र या मार्गावर बसच्या फेऱ्या अपुऱ्या असल्याने नेवासा बसस्थानकासह विविध थांब्यांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असून प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण होत आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपा युवा नेते मनोजआण्णा पारखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज आगार व्यवस्थापक मा. श्री. होले साहेब यांची भेट घेऊन नेवासा–अहिल्यानगर मार्गावरील बसफेऱ्या वाढविण्याची मागणी केली. या मागणीवर आगार व्यवस्थापकांनी सकारात्मक प्रतिसाद देत उद्यापासूनच या मार्गावर वाढीव शटलबसफेऱ्या सुरू करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने घेतलेल्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष रोहितजी पवार, युवा मोर्चा शहराध्यक्ष शिवाभाऊ लष्करे तसेच भाजपा सचिव रामदास लष्करे उपस्थित होते.

