spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedनेवासा बाजार समितीतून ३० टन कांद्याची दुबईला निर्यात..

नेवासा बाजार समितीतून ३० टन कांद्याची दुबईला निर्यात..

हरिओम एंटरप्राइजेसच्या माध्यमातून पहिला कंटेनर १२०० गोण्या, म्हणजेच सुमारे ३० टन कांदा मुंबईमार्गे जहाजाद्वारे दुबईला रवाना करण्यात येणार आहे– व्यापारी दीपक नाबदे



नेवासा (प्रतिनिधी)

: ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या प्रेरणेने व माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू झालेल्या कांदा मार्केटला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून येथील दर्जेदार कांद्याला परदेशातूनही मागणी वाढत आहे.

याच पार्श्वभूमीवर हरिओम एंटरप्राइजेसच्या माध्यमातून रविवारी सुमारे ३० टन कांद्याचा पहिला कंटेनर दुबईकडे रवाना करण्यात आला.


हरिओम एंटरप्राइजेसच्या वतीने दुबईला रवाना होणाऱ्या कांद्याच्या पहिल्या कंटेनरचे पूजन बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी कांदा व्यापारी अर्जुन पंडित, दीपक नाबदे व अर्जुन वाबळे यांच्या वतीने सभापती नंदकुमार पाटील, संचालक अरुण शिंदे, राजेंद्र सानप, सुनील धायजे तसेच नगरसेवक संभाजीराव धोत्रे यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी बोलताना सभापती नंदकुमार पाटील म्हणाले, माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकारामुळे नेवासा येथे कांदा मार्केट सुरू झाले असून त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे. बाजार समितीत दर्जेदार कांदा उपलब्ध होत असल्याने परदेशातूनही मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांनी आपला कांदा नेवासा बाजार समितीतच विक्रीस आणावा, यासाठी संचालक मंडळाच्या माध्यमातून अधिकाधिक चांगला भाव मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.


बाजार समितीच्या आवारातील गाळा क्रमांक १६ मधील हरिओम एंटरप्राइजेसचे कांदा निर्यातदार व्यापारी अर्जुन पंडित यांनी सांगितले की, सुमारे महिनाभरापूर्वी येथे कांदा मार्केट सुरू करण्यात आले. बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील व संचालक मंडळ शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे. बाजारात दर्जेदार कांदा उपलब्ध होत असल्याने परदेशातून मागणी वाढत आहे.

आता रविवारीही कांदा खरेदी सुरू राहणार : नंदकुमार पाटील


माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ६ मेपासून कांदा खरेदी-विक्री सुरू करण्यात आली आहे. दर मंगळवार व गुरुवारी होणाऱ्या लिलावांना शेतकरी व व्यापाऱ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याने आता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रविवारीही कांदा खरेदी सुरू करण्यात येणार— नंदकुमार पाटील यांनी यावेळी केली.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
75 %
6.6kmh
100 %
Tue
27 °
Wed
30 °
Thu
27 °
Fri
29 °
Sat
30 °

Most Popular

error: Content is protected !!