spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedमक्तापूर येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य देऊन...

मक्तापूर येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य देऊन स्वागत


नेवासा प्रतिनिधी : गणेश झगरे


नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथील जिल्हा परिषद शाळा, साळवे वस्ती येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पुस्तके, गणवेश, कपडे व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.


सकाळी साडेनऊ वाजता आयोजित कार्यक्रमात मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना झगरे यांनी पहिलीच्या विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांनी केलेले स्वागत कौतुकास्पद असल्याचे सांगितले. पालकांनी मुलांना आनंदाने जिल्हा परिषद शाळेत पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले.


यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळांमधील घटत्या विद्यार्थी संख्येबाबत चिंता व्यक्त केली. शाळांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. शाळेचे शौचालय खराब झाले असून वारंवार मागणी करूनही दुरुस्ती होत नसल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी संख्या सातत्याने कमी होत असल्याने भविष्यात जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.


कार्यक्रमात शिक्षिका सीमा मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच सुदर्शन इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शकूर इनामदार यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


यावेळी गणेश झगरे, दीपक साळवे, बाळासाहेब शिरसाट, प्रदीप साळवे, अमोल शिरसाट, सुनील गव्हाणे, संदीप बर्डे, सुरेश बर्डे, दादासाहेब बर्डे, रावसाहेब गव्हाणे, सोमनाथ गायकवाड, सचिन गायकवाड, मोहन खैरे, दिगंबर कांगणे, मनोज झगरे, अविनाश बर्डे यांच्यासह मक्तापूर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
75 %
6.6kmh
100 %
Tue
27 °
Wed
30 °
Thu
27 °
Fri
29 °
Sat
30 °

Most Popular

error: Content is protected !!