spot_img
spot_img
Homeअध्यात्मिकशिंगणापूर देवस्थानला अधिक महिना पावला, दानपेटीत ६८लाख रुपये

शिंगणापूर देवस्थानला अधिक महिना पावला, दानपेटीत ६८लाख रुपये

अधिक महिन्यात शनिशिंगणापूरला भाविकांचा महापूर अडीच लाख रुपयांची सोने-चांदी



नेवासा

तीन वर्षांतून एकदाच येणाऱ्या पवित्र अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे भाविकांची विक्रमी गर्दी झाली. देश-विदेशातून लाखो भाविकांनी शनिराजांच्या दर्शनासाठी हजेरी लावत श्रद्धेने दान अर्पण केले. यामुळे श्री शनैश्वर देवस्थानच्या दानपात्रात रोख रक्कम, सोने व चांदी मिळून तब्बल ६८ लाखांहून अधिक देणगी जमा झाली आहे.


देवस्थान प्रशासनाच्या माहितीनुसार, मागील महिनाभरात दानपात्रात रोख स्वरूपात ६४ लाख ७२ हजार ४६१ रुपये जमा झाले असून, सोने व चांदीच्या स्वरूपात २ लाख ४९ हजार ३९६ रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. देवस्थानच्या उदासी महाराज सभागृहात कडक सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही देखरेखीखाली दि. १२ जून रोजी कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांच्या उपस्थितीत दानाची मोजणी करण्यात आली.


दानपात्रातील रोख रकमेत ६१ लाख ९६ हजार ३६१ रुपयांच्या नोटा व २ लाख ७६ हजार १०० रुपयांची चिल्लर आढळून आली. तर मौल्यवान देणगीत २ लाख १९ हजार ९३६ रुपयांचे सोने आणि २९ हजार ४६० रुपयांची चांदी प्राप्त झाली.


नुकतीच झालेली शनिजयंती, शनि अमावस्या तसेच अधिक महिन्यामुळे शनिशिंगणापूर येथे अभूतपूर्व गर्दी झाली होती. आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनिशिंगणापूरमध्ये महिनाभर दररोज भाविकांची मोठी रेलचेल पाहायला मिळाली. अधिक महिन्याच्या अखेरच्या दिवशी सोमवती अमावस्या आणि शाळांचा पहिला दिवस एकाच दिवशी आला होता. तरीही अनेक पालकांनी प्रथम शनिराजांचे दर्शन घेऊनच आपल्या पाल्यांना शाळेत प्रवेशासाठी नेल्याचे चित्र पाहायला मिळाले.


भाविकांनी दाखविलेल्या अढळ श्रद्धा आणि विश्वासामुळे देवस्थानला मोठ्या प्रमाणात देणगी प्राप्त होत असल्याचे देवस्थान प्रशासनाने नमूद केले आहे. अधिक महिन्यातील या विक्रमी गर्दीमुळे शनिशिंगणापूरची धार्मिक आणि आध्यात्मिक महत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!