spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedरविवारी देखील रंगला कांद्याचा बाजार सही तर

रविवारी देखील रंगला कांद्याचा बाजार सही तर

उत्स्फूर्त आवक आणि उत्साही दर



नेवासा (प्रतिनिधी) – कृषी उत्पन्न बाजार समिती, नेवासा यांनी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी रविवारच्या दिवशीही कांदा खरेदी-विक्री उपक्रम सुरू केला असून या उपक्रमाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी झालेल्या कांदा लिलावासाठी सुमारे १०० वाहनांमधून कांद्याची आवक झाली.


बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना अधिक सोयीस्कर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रविवारच्या दिवशीही कांदा खरेदी-विक्री सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद समाधानकारक असून खुल्या कांदा विक्री केंद्र परिसरातील शेतकऱ्यांनी दाखविलेल्या सहभागाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.


दि. १४ जून २०२६ रोजी झालेल्या लिलावात कांद्याला प्रतिक्विंटल किमान २०० रुपये, कमाल १५०० रुपये तर सरासरी ८०० ते १००० रुपये असा भाव मिळाला. बाजार समितीने शेतकरी बांधवांना बाजारभावांचा अभ्यास करूनच माल विक्रीस आणण्याचे आवाहन केले आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
37.7 ° C
37.7 °
37.7 °
31 %
5.5kmh
0 %
Wed
40 °
Thu
40 °
Fri
39 °
Sat
40 °
Sun
40 °

Most Popular

error: Content is protected !!