spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedमहिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची धडक कारवाई; प्रतिबंधित मावा जप्त

महिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची धडक कारवाई; प्रतिबंधित मावा जप्त

राजकीय दबाव झुगारून कारवाई पूर्ण; नेवासा पोलिसांत गुन्हा दाखल

नेवासा

: सत्ताधारी पक्षाच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याचा कथित राजकीय दबाव न जुमानता अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी उज्ज्वला रमन पाटील यांनी उस्थळ दुमला (ता. नेवासा) येथे प्रतिबंधित मावा विक्रीवर धडक कारवाई करत मावा व कातरलेली सुपारी जप्त केली. कारवाई थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित पदाधिकाऱ्याला स्पष्ट शब्दांत सुनावत त्यांनी कारवाई पूर्ण केल्याने त्यांच्या धाडसी भूमिकेची तालुक्यात चर्चा होत आहे.


अन्न व औषध प्रशासनाला मे. शिवछत्रपती इंटरप्रायजेस येथे प्रतिबंधित मावा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दि. २ जुलै रोजी सहाय्यक आयुक्त अ. अ. भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. कारवाई सुरू असतानाच एका स्थानिक पदाधिकाऱ्याने दूरध्वनीद्वारे हस्तक्षेप करून कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. मात्र, “शासकीय कामात अडथळा आणू नका,” असे स्पष्ट शब्दांत सांगत अन्न सुरक्षा अधिकारी उज्ज्वला पाटील यांनी कोणताही दबाव न स्वीकारता कारवाई सुरू ठेवली.


झडतीदरम्यान गणेश रावसाहेब पिटेकर (वय ३४) हा दुकानात आढळून आला, तर दुकानमालक रामकिसन पिटेकर अनुपस्थित होता. दुकानातून सुमारे ८५० रुपयांचा प्रतिबंधित मावा व कातरलेली सुपारी जप्त करण्यात आली.


याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उज्ज्वला रमन पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय दबावाला बळी न पडता नियमानुसार कारवाई करणाऱ्या महिला अधिकाऱ्याच्या धाडसी भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक व्यक्त होत आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
75 %
6.6kmh
100 %
Tue
27 °
Wed
30 °
Thu
27 °
Fri
29 °
Sat
30 °

Most Popular

error: Content is protected !!