spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedहलक्या मुरमाड जमिनीत शेवग्याची 'सुवर्णशेती';

हलक्या मुरमाड जमिनीत शेवग्याची ‘सुवर्णशेती’;

गिडेगावच्या साळुंके या शेतकऱ्याला एकरी अडीच लाखांचे उत्पन्न



नेवासा (प्रतिनिधी)

: पारंपरिक पिकांऐवजी आधुनिक नियोजन आणि तांत्रिक मार्गदर्शनाचा आधार घेत गिडेगाव (ता. नेवासा) येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र साळुंके यांनी शेवगा लागवडीतून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अवघ्या साडेपाच महिन्यांत उत्पादनाला सुरुवात झाल्याने त्यांना एका एकरातून सुमारे अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असून, त्यांची ही शेती परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


साळुंके यांनी हैदराबाद जातीच्या शेवग्याची बियाणे सोलापूर येथून आणून लागवड केली. या जातीची झाडे बुटकी असल्याने शेंगा काढणे सोपे जाते. लागवडीवेळी दोन ओळींमध्ये साडेनऊ फूट, तर दोन रोपांमध्ये सहा फूट अंतर ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने लागवड करण्यात आली. सुरुवातीला केवळ शेणखताचा वापर करण्यात आला. त्यानंतर ठिबक सिंचनाद्वारे १२:६१, ०:५२:३४ आणि १९:१९:१९ ही विद्राव्य खते योग्य प्रमाणात दिल्याने पिकाची वाढ जोमदार झाली. असल्याचे साळुके सांगतात


एका एकरात सुमारे १,३०० झाडांची लागवड करण्यात आली असून, अवघ्या साडेपाच महिन्यांतच झाडांना मोठ्या प्रमाणावर फुले व शेंगा लागण्यास सुरुवात झाली. शेतावरच ग्राहक येऊन ताज्या शेंगा खरेदी करत असल्याने बाजारपेठेची अडचणही भासत नसल्याचे साळुंके यांनी सांगितले. एका एकरातून सुमारे चार टन उत्पादन मिळण्याचा अंदाज असून, त्यातून अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे.


यावेळी कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी शेवगा प्लॉटची पाहणी करून साळुंके यांच्या प्रयोगशीलतेचे कौतुक केले. शेवगा पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव अत्यल्प असल्याने कीटकनाशक फवारणीची गरज भासत नाही. त्यामुळे शेवग्याच्या शेंगा पौष्टिक, सुरक्षित व आरोग्यदायी ठरतात, असे त्यांनी सांगितले.
कमी पाणी, हलकी मुरमाड जमीन आणि योग्य तांत्रिक व्यवस्थापन यांचा संगम साधल्यास शेवगा हे अत्यंत फायदेशीर नगदी भाजीपाला पीक ठरू शकते. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनीही पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून शेवगा लागवडीचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन डॉ. ढगे यांनी केले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
75 %
6.6kmh
100 %
Tue
27 °
Wed
30 °
Thu
27 °
Fri
29 °
Sat
30 °

Most Popular

error: Content is protected !!