नेवासा (प्रतिनिधी) :
मराठी पत्रकार परिषद, नेवासा तालुक्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सोनई येथील अंजली हॉटेल येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत तालुक्यातील पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटीसह आगामी वर्षातील कार्याचा आराखडा, नवीन कार्यकारिणीची निवड आणि विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
ही सभा नेवासा तालुका अध्यक्ष मा. नामदेव शिंदे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून उत्तर नगर जिल्हाध्यक्ष मा. अमोल वैद्य, जिल्हा मार्गदर्शक गुरुप्रसाद देशपांडे, उत्तर नगर जिल्हा सहसरचिटणीस दिलीप शिंदे तसेच जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ कचरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सभेमध्ये मागील वर्षाचा कामकाजाचा अहवाल सादर करण्यात येणार असून, सन २०२६-२७ या वर्षासाठी सर्वानुमते पदाधिकारी व कार्यकारिणीची निवड करण्यात येईल. तसेच अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा केली जाणार आहे.
मराठी पत्रकार परिषद, नेवासा तालुक्यातील सर्व पदाधिकारी व सन्माननीय सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहून सभेचे कामकाज यशस्वी करण्याचे आवाहन कार्याध्यक्ष अशोकराव भुसारी व सेक्रेटरी अशोक पेहरकर यांनी केले आहे.

