spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedफॅक्टरी जिल्हा परिषद शाळेची शिष्यवृत्तीत दमदार कामगिरी; १२ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश..

फॅक्टरी जिल्हा परिषद शाळेची शिष्यवृत्तीत दमदार कामगिरी; १२ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश..



भेंडा | नामदेव शिंदे (प्रतिनिधी)


नेवासा तालुक्यातील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भेंडा फॅक्टरी येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटविला आहे.

यंदाच्या परीक्षेत तब्बल १२ विद्यार्थ्यांनी यश मिळवत शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राखली.
या परीक्षेत ऋत्वा राजेंद्र गवळी हिने २६० गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. गायत्री राम नजन हिने २२८ गुणांसह द्वितीय, तर सिद्धेश योगेश फुलारी याने २२२ गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.


याशिवाय आराध्या बाळासाहेब हिवाळे (१६४), स्वरा राहुल कोलते (१५२), आफरीन खाकीसाहेब सय्यद (१५०), रुद्र संदीप निकम (१४६), सर्वेश भाऊसाहेब जगताप (१४२), श्लोक अक्षय रसाळ (१३८), मरियम मोसिन पठाण (१३६), कार्तिकी सुनील शिंदे (१२८) आणि माऊली तात्यासाहेब कापसे (१२६) यांनीही उल्लेखनीय गुण मिळवत यशाची नोंद केली.


या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना कानिफनाथ दौंड, सुनिता माळशिखरे आणि मंगल मुळे या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि शाळेत राबविण्यात येणारे गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रम यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करून घेण्यावर शाळेने दिलेला भर या निकालातून अधोरेखित झाला आहे.


या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याध्यापक संजय कडुस, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!