उपाध्यक्षपदी संतोष टेमक, सचिवपदी राजेंद्र लाटे यांची बिनविरोध निवड
सोनई (प्रतिनिधी):
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या नेवासा तालुका शाखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये अशोकराव भुसारी यांची तालुकाध्यक्षपदी, संतोष टेमक यांची उपाध्यक्षपदी, तर राजेंद्र लाटे यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
सोनई येथील सुजाता इंटरनॅशनल स्कूल येथे मावळते तालुकाध्यक्ष नामदेव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थित पत्रकारांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या बैठकीस मराठी पत्रकार परिषदेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, जिल्हा मार्गदर्शक गुरुप्रसाद देशपांडे, उत्तर नगर जिल्हा सहसरचिटणीस दिलीप शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ कचरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली
. यावेळी मागील वर्षभरात नेवासा तालुक्यातील स्वर्गवासी झालेले पत्रकार प्रकाश दारकुंडे वृत्तपत्र विक्रेते लक्ष्मणराव मोटे तसेच इतरही वृत्तपत्र क्षेत्रातील मयत झालेल्या व्यक्तिमत्त्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली
या बैठकीत पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर, संघटनात्मक बळकटीकरण, पत्रकारांचे हित, तसेच आगामी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा व विचारविनिमय करण्यात आला.
यावेळी संभाजी शिंदे, गणेश बेल्हेकर, रवी शेटे, ल, किशोर दरंदले यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते. तसेच सुजाता इंटरनॅशनल स्कूल विद्यालय चे संस्थापकL प्रमुख किरण सोनवणे आणि अनिल निमसे यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
यावेळी मावळते तालुकाध्यक्ष नामदेव शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात संघटना बळकट करण्यासाठी केलेल्या कार्याचा उपस्थित पत्रकारांनी गौरव केला. तसेच त्यांच्या कार्याची दखल घेत मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा कार्यकारिणीत त्यांची वर्णी लागणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. याबद्दल उपस्थित पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या जिल्हास्तरीय जबाबदारीमुळे संघटनेला अधिक बळ मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष अशोकराव भुसारी, उपाध्यक्ष संतोष टेमक आणि सचिव राजेंद्र लाटे यांनी आपल्या मनोगतात मराठी पत्रकार परिषदेची संघटना नेवासा तालुक्यात अधिक मजबूत, व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. पत्रकारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे, नवोदित पत्रकारांना संघटनेशी जोडणे, पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे आणि सर्व पत्रकारांना एकत्रित घेऊन संघटनात्मक बळकटीसाठी कार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सक्रिय सहभाग घेऊन लवकरच विस्तारित तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असून, संघटनेचा विस्तार अधिक प्रभावीपणे करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष टेमक यांनी केले तर आभार गणेश बेल्हेकर यांनी मानले.

