spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedसुवर्ण महोत्सवी श्री  माहुरगड पदयात्रेचे नेवासे येथे उत्स्फूर्त भव्य स्वागत

सुवर्ण महोत्सवी श्री  माहुरगड पदयात्रेचे नेवासे येथे उत्स्फूर्त भव्य स्वागत

कैलासवासी रेवणनाथ महाराजांनी सुरु केलेलीदिंडीचे25वे सुवर्ण महोत्सवी वर्ष

नेवासे

वडाळा महादेव येथील मौनयोगी सदगुरू श्री रेवणनाथ महाराज यांच्या प्रेरणेने श्री रेणुका आश्रम ते माहुरगड या पदयात्रेचे नेवासेनगरीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.पायी पदयात्रेचे हे रौप्य महोत्सवी २५ वे वर्ष आहे.दि.३१ जुलै निघालेली ही माहुरगड पदयात्रा दि.१६ ऑगस्ट रोजी माहुरगड येथे पोहचणार आहे.रेणुका आश्रमाचे प्रमुख अँड.आदिनाथ जोशी व सौ.आदिती जोशी हे या पदयात्रेचे नेतृत्व करत आहे.


    पदयात्रेच्या तिसऱ्या दिवशी नेवासे शहरात पायी पदयात्रा दिंडीचे आगमन झाले असता येथील श्री खोलेश्वर गणपती मंदिर चौकात
नेवासेकरांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी पदयात्रा दिंडी चालक अँड.आदिनाथ जोशी यांचा पुरातन म्हाळसा खंडोबा देवस्थान जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष संभाजी ठाणगे व राजेंद्र काशीद,राजेंद्र थावरे,वृक्ष मित्र अमृत फिरोदिया यांच्या हस्ते  सन्मान करण्यात आला.

मोहिनीराज मंदिर भक्त निवासस्थानी दिंडी मुक्काम ठिकाणी भक्त मंडळाने स्वागत केले याठिकाणी दीपक जोशी निखील जोशी यांनी देवीचे पूजन केले चौथ्या दिवशी सकाळी दिंडीचे जयकुमार गुगळे परिवाराने स्वागत केले व देवी ची आरती केली


      पदयात्रा दिंडीचे हे २५ वे वर्ष असल्याने टाकळीभान, बेलपिंपळगावफाटा,साईनाथनगर,एस कॉर्नर,परिसर, नेवासा बुद्रुक नेवासा येथे ठीक ठिकाणी भक्त मंडळाच्या सेवेकऱ्यांच्या वतीने माहुरगडाकडे जाणाऱ्या पायी पद यात्रेचे अनेकांनी स्वागत करून पालखी दिंडीतील रेणुकामातेचे मनोभावे पूजा करून दर्शन घेतले.सदरची पायी दिंडी ही दि.१६ ऑगस्ट रोजी माहूरगडावर पोहचणार असल्याचे दिंडी चालक अँड.आदिनाथ जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!