spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedलेखनातून समाजजागृतीचा दीप प्रज्वलित करणारे अण्णाभाऊ साठे : डॉ. अरुण घनवट

लेखनातून समाजजागृतीचा दीप प्रज्वलित करणारे अण्णाभाऊ साठे : डॉ. अरुण घनवट

‘लेखन प्रेरणा दिन ‘कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी


नेवासा

: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या विलक्षण प्रतिभेच्या बळावर मराठी साहित्याला जागतिक स्तरावर पोहोचविले. लेखणीच्या सामर्थ्याने ते सातासमुद्रापार झुंजार लेखक म्हणून ओळखले गेले, असे प्रतिपादन श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण घनवट यांनी केले.


श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित ‘लेखन प्रेरणा दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. डॉ. रवींद्र चव्हाण यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. अजय पाटील, डॉ. एन. डी. शेख, डॉ. उमेश कांबळे, डॉ. राजेश वाघ, डॉ. भागवत बर्डे, डॉ. जगदीश सोनवणे, प्रा. गणेश गारोळे, डॉ. रजनीकांत पावशेर, डॉ. पिसाळ, प्रा. आवटी, डॉ. अशोक साळवे आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा. अमोल जाधव, प्रा. संजय शिंदे, श्री पतंगे तसेच विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कार्तिकी नागरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रवींद्र चव्हाण यांनी मानले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!