पाच नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा लोकार्पण सोहळा
नेवासा प्रतिनिधी
: नेवासा तालुक्याच्या विकासामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नेवासा आगारात नव्याने दाखल झालेल्या पाच ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा लोकार्पण सोहळा आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे आमदार लंघे यांनी स्वतः बसचे स्टेअरिंग हाती घेत बस चालवत सेवेचे लोकार्पण केले.
यावेळी आमदार लंघे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी यापूर्वी नेवासा आगारात दहा नव्या बसेस दाखल करण्यात आल्या असून, आता आणखी पाच बसेसची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील बससेवा अधिक सक्षम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले पाटील म्हणाले, “स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर कोऱ्या करकरीत पाच बसेस नेवासा आगारात दाखल झाल्या आहेत. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, इतिहासात प्रथमच नेवासा तालुक्याला आतापर्यंत १५ बसेस मिळाल्या आहेत. त्यामुळे नेवासेकरांच्या विकासाचे स्टेअरिंग आमदार लंघे यांच्या हातात आले आहे,” असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास अगर प्रमुख संदीप ढवळे यांनी उपस्थित त्यांचे स्वागत व सत्कार केला संघटनेचे अध्यक्ष अनिल ताके, डॉ. निलेश लोखंडे, माजी सभापती शंकरराव लोखंडे, माऊली पेचे, अंकुश म्हस्के, आदिनाथ पटारे, प्रवीण सरोदे, अनिल पवार, कृष्णा परदेशी, संदीप सरकाळे, नितीन जगताप, भाऊसाहेब वाघ, बाळासाहेब पवार, अॅड. कर्डक भाऊसाहेब, अॅड. मयूर वाखुरे, रवींद्र पिंपळे आदी उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार संजय बिराजदार, गट विकास अधिकारी, संजय लखवाल, नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे, आदी मान्यवर हजर होते

