spot_img
spot_img
Homeशैक्षणिकनेवासा तालुक्यातील शंभर टक्के शाळा कुसुमाग्रज वाचन अभियानात भाग घेणार - गटशिक्षणाधिकारी...

नेवासा तालुक्यातील शंभर टक्के शाळा कुसुमाग्रज वाचन अभियानात भाग घेणार – गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर

रिंगिंग बेलच्या उपक्रमाने आठवड्यात अर्धा तास सामुदायिक वाचन होणार

नेवासा

नेवासा तालुक्यातील शंभर टक्के शाळा ‘कुसुमाग्रज वाचन अभियानात’ भाग घेणार असल्याचे गटशिक्षणाधिकारीसंजय कळमकरयांनी सांगितले


नेवासा तालुका गट शिक्षण अधिकारी म्हणून कार्यभार घेतल्या नंतर ते पत्रकारांशी बोलत होते

जागतिक प्रेमाच्या व्हॅलेंटाईन डे या 14 फेब्रुवारी रोजी ‘पुस्तकांवर प्रेम करा ‘ हा संदेश देत नगर जिल्ह्यामध्ये कुसुमाग्रज वाचन अभियान सुरू करण्यात आले आहे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आनंद भंडारे व जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाने मुलांचे मोबाईल स्क्रीन टाईम कमी करणे वाचन व संवाद कौशल्य वाढवणे अभ्यासाची गोडी लावून व्यक्तिमत्व विकास करणे असे हेतू साध्य करण्यात येणार आहेत

वरिष्ठांनी मोठ्या शाळांमध्ये राबवण्याचे सांगितले असले तरी नेवासा तालुक्यात मात्र जिल्हा परिषदेच्या 250 शाळा आणि 107 माध्यमिक शाळा मध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामागे पाच पुस्तके आणि प्रत्येक शिक्षकांमध्ये 25 पुस्तके शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत

नेवासा तालुक्यात हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी” रीडिंग बेल’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे प्रत्येक शनिवारी आणि सोमवारी ही रीडिंग बेल वाजवल्यानंतर अर्धा तास शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी वाचन करायचे आहे त्याचबरोबर सारांश लेखन’ शब्दांच्या भेंड्या म्हणी लेखकांची टोपण नावे आधी उपक्रम राबविण्यात येणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा परीक्षेसाठी देखील तयारी होणार आहे असेही गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर यांनी सांगितले

उपक्रम यशस्वी करण्यासाठी नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी देखील पुढाकार घेतला आहे प्रत्येक ग्रामसेवकाने आपल्या गावच्या शाळेमध्ये शंभर पुस्तके द्यावीत असे आवाहन त्यांनी केले आहे

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!