spot_img
spot_img
Homeशैक्षणिकबेल्हेकर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटचा उत्कृष्ट निकाल

बेल्हेकर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटचा उत्कृष्ट निकाल

विद्यार्थ्यांना १००% नोकरीची हमी मिळण्यासाठी ट्रेनिंग पेल्समेंट विभाग असलेली एकमेव संस्था.

नेवासे

:
नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्था संचालित ज्ञानेश्वर पॉलिटेक्निक (तंत्रनिकेतन) चा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण बोर्ड मुंबई (एमएसबीटीई) बोर्डाने नुकताच निकाल जाहीर केला आहे, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळांने सर्व विद्यार्थीची उन्हाळी २०२६ परीक्षा हि ऑफलाईन पद्ध्तीने MSBTE ने घेतली होती याचा ज्ञानेश्वर पॉलिटेक्निक (तंत्रनिकेतन) चा सर्व 80% उत्कृष्ट निकाल लागला


सर्व विभागातून प्रथम वर्षातील संगणक विभागातून वल्ले संस्कृती ज्ञानदेव (८७.७७ टक्के) याने प्रथम क्रमांक पटकावला. प्रथम वर्षातील संगणक विभागातील कर्हाळे कल्याणी अरविंद (८६.३५ टक्के) हिने द्वितीय क्रमांक मिळविला तर प्रथम वर्षातील संगणक विभागातून चिधे प्रणाली सोमनाथ (८५.१८ टक्के) याने तृतीय क्रमांक मिळविला.


ज्ञानेश्वर पॉलिटेक्निक उत्कुष्ठ निकालाची परंपरा राखत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विभागीय निकाल खालील प्रमाणे

  • संगणक विभागात द्वितीय वर्षातील घोडेचोर अंजली मिलिंद (८३.५४ टक्के), तृतीय वर्षातील शिंदे अनुराग दत्तात्रय (८२.५३ टक्के), आणि तृतीय वर्षातील शिंदे सुषमा जयनाथ (८२.०० टक्के)
  • इलेक्ट्रॉनिक्स विभागात तृतीय वर्षातील जाधव शिवम बंडू (८३.४३ टक्के), तृतीय वर्षातील भोसले पियुष शिवाजी (८२.९७ टक्के) आणि तृतीय वर्षातील नवघरे बाळकृष्ण मच्छिंद्र (८१.४३ टक्के)
  • स्थापत्य विभागात प्रथम वर्षातील गायकवाड आरती विजय (८४.४४ टक्के), तृतीय वर्षातील केंदळे प्राची संदीप (८०.५० टक्के), आणि तृतीय वर्षातील शेळके क्षितिज प्रकाश (७८.६१ टक्के)
  • मेकॅनिकल विभागात द्वितीय वर्षातील इंगळे कृष्ण विजय (७८.६७ टक्के), द्वितीय वर्षातील विटनोर शुभम बाळासाहेब (७७.०० टक्के) आणि द्वितीय वर्षातील पिसे वैभव बाबासाहेब व द्वितीय वर्षातील सरोदे यश अशोक (७६.३३ टक्के)

सर्व विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा.योगेश भागवत, प्रा.सुदर्शन शिंदे, प्रा.योगेश मानळ, प्रा. सुनील कांबळे, प्रा.शारुख पठाण, प्रा.अजय बाविस्कर, प्रा.शिंदे, प्रा.खुळे, प्रा.पागिरे, प्रा.कुंधारे, प्रा.शेंडगे, प्रा.दले, प्रा.वाघ, प्रा.कारले, प्रा. देशमुख, प्रा.वांडेकर आदींचे मार्गदर्शन लाभल्याचे प्राचार्य एच.जे.आहिरे यांनी सांगीतले.

ज्ञानेश्वर पॉलिटेक्निक (तंत्रनिकेतन) मधील सर्व प्राध्यापक हे अनुभवी व उच्चशिक्षित असून त्याचा पूर्ण वेळ हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपलब्ध आहे ज्ञानेश्वर पॉलिटेक्निक (तंत्रनिकेतन) प्रशस्त इमारती सोबतच अद्यावत असे कॉम्पुटर सेंटर पँक्टिकल ग्रंथालय इंटरनेट स्वतंत्र होस्टेल भव्यदिव्य वर्कशोप अशा सुविधा देण्यात आले आहेत, तसेच विद्यार्थ्यांना १००% नोकरीची हमी मिळण्यासाठी ट्रेनिंग पेल्समेंट विभाग कार्यरथ आहे.


संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेशराव बेल्हेकर, संचालिका डॉ. रंजना बेल्हेकर, संचालक अभिषेक बेल्हेकर, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ.ए.एम.इंगळे सर आणि प्राचार्य एच.जे.आहिरे यांनी गुणवंताचे कौतुक केले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!