spot_img
spot_img
Homeक्राइममहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) ची धडक कारवाई....

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) ची धडक कारवाई….

नेवासा


महावितरणच्या वतीने वीजचोरी आणि थकीत वीजबिल वसुलीसाठी धडक कारवाई करण्यात आली. उपकार्यकारी अभियंता श्री बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता श्री कांडेकर यांनी प्रधान तंत्रज्ञ श्री सोमनाथ चव्हाण, श्री सतीश तिडके, श्री भरत काळे, श्री अमोल राठोड, सौ. जयश्री सपकाळ, श्री बाळासाहेब औटी, श्री सुरेश चव्हाण, श्री एकनाथ दातीर, श्री किरण डोले, श्री वाहिद देशमुख आदी कर्मचाऱ्यांसह ही कारवाई केली.


या मोहिमेत वीजचोरी करणाऱ्या तसेच थकीत वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांवर कठोर पावले उचलण्यात आली. संबंधितांना दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला असून, थकबाकीदारांचे वीजजोडणी तत्काळ खंडित करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.


सहाय्यक अभियंता श्री कांडेकर यांनी ग्राहकांना आवाहन करताना वीजचोरी करू नये व थकीत बिल तातडीने भरावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. पुढील काळातही अशीच धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या कारवाईमुळे वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!