spot_img
spot_img
Homeक्राइमप्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; ९.१६ लाखांचा डंपर जप्त

प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; ९.१६ लाखांचा डंपर जप्त

डंपर चालक फरार वाळू तस्करांमध्ये खळबळ


नेवासा (प्रतिनिधी) : प्रवरा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या डंपरवर नेवासा पोलिसांनी कारवाई करत सुमारे ९ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, डंपर चालक पोलिसांच्या ताब्यातून निसटून फरार झाला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डायल ११२ पथक रात्रगस्त करत असताना गुप्त माहितीच्या आधारे चिंचबन रोडलगत प्रवरा नदीपात्र परिसरात छापा टाकण्यात आला. पहाटेच्या सुमारास नदीपात्रातून बाहेर येणारा एक डंपर अडविण्यात आला. चालकाने आपले नाव काळू शिवाजी आळपे (वय ३५, रा. गंगानगर, नेवासा खुर्द) असे सांगितले. चौकशीदरम्यान त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे समोर आले.


पोलिसांनी चालकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने हाताला हिसका देऊन अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. त्याचा शोध घेण्यात आला; मात्र तो आढळून आला नाही.


या कारवाईत चार ब्रास वाळू भरलेला विनाक्रमांकाचा डंपर व वाळूसह एकूण ९ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी काळू शिवाजी आळपे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम ३ व १५ अन्वये नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!