spot_img
spot_img
Homeशेतीकृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांना कृषी आयकॉन्स अवॉर्ड २०२६ जाहीर ....

कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांना कृषी आयकॉन्स अवॉर्ड २०२६ जाहीर ….

दैनिक सार्वमतच्या वतीने दिला जाणारा हा कृषी आयकॉन्स अवॉर्ड

नेवासा

अहिल्यानगर जिल्ह्यातील भूमिपुत्र व नामवंत कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांना कृषी आयकॉन्स अवॉर्ड २०२६ जाहीर झाला आहे. नेवासा या ऐतिहासिक व धार्मिक भूमीतून उभ्या राहिलेल्या कृषी विचारांना मिळालेला हा एक प्रकारे सुवर्ण सन्मान मानला जात आहे.


“शेती सेवा हा धर्म” अशी भूमिका स्वीकारत डॉ. ढगे यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी कार्य केले. त्यांनी कृषी विषयावर सुमारे ४०० लेख, १५ पुस्तके, तसेच आकाशवाणीच्या ‘हॅलो बळीराजा’ कार्यक्रमातून २३ भागांमध्ये मार्गदर्शन केले आहे. दूरदर्शनवरही विविध कृषी तंत्रज्ञानाविषयी कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवले.


प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू तसेच मृदशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. सेवानिवृत्तीनंतरही शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांनी आंदोलन केले असून त्यासाठी तुरुंगवासही भोगला आहे. संशोधन, शिक्षण आणि कृषी विस्तार या तिन्ही क्षेत्रांत त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे.


दैनिक सार्वमतच्या वतीने दिला जाणारा हा कृषी आयकॉन्स अवॉर्ड त्यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेत जाहीर करण्यात आला आहे. याबाबत डॉ. ढगे यांनी सांगितले की, कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या कृषीविषयक लेखांना दैनिक सार्वमतमध्ये प्रसिद्धी मिळाल्याने काम करण्याची प्रेरणा मिळाली.
तसेच तीन कृषी महाविद्यालये स्थापन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अहवालात त्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. शेतीसाठी पाणी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असल्याने घाटमाथ्यावरील पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे गोदावरी खोऱ्याकडे वळवावे, या मागणीसाठी त्यांनी मुंबई येथे आंदोलन करून अटकही पत्करली होती.
डॉ. अशोकराव ढगे यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न थांबवण्यासाठी शेतकरी संरक्षण कायदा आणि जोखीम व्यवस्थापन याबाबतही आपण पुढील काळात प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.5 ° C
26.5 °
26.5 °
77 %
5.5kmh
100 %
Wed
27 °
Thu
30 °
Fri
30 °
Sat
31 °
Sun
31 °

Most Popular

error: Content is protected !!