spot_img
spot_img
Homeशेतीमुळा उजव्या कालव्याचे ४०दिवसांचेआवर्तन २९ एप्रिलपासून; शेतकऱ्यांना मोठा दिलासा..

मुळा उजव्या कालव्याचे ४०दिवसांचेआवर्तन २९ एप्रिलपासून; शेतकऱ्यांना मोठा दिलासा..

नेवासा भागात पिक विमा आणि पाण्याची आवर्तन एकाच दिवशी आले

नेवासा :
नेवासा : महाराष्ट्रात प्रचंड उष्णतेची लाट उसळली असून अनेक भागांत तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. वाढत्या उन्हामुळे जलसाठे झपाट्याने कमी होत असून विहिरी, तलाव आणि ओढे आटण्याच्या स्थितीत आले आहेत. रब्बी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पिके वाचवण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे गावागावातील शेतकऱ्यांचे लक्ष आवर्तन कधी सुटणार याकडे लागले होते.


ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन मुळा लाभक्षेत्रातील मुळा उजव्या कालव्यावरील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी आणि वाढती उन्हाची तीव्रता विचारात घेता उन्हाळी हंगामासाठी २९ एप्रिल २०२६ पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली.


सध्या लाभक्षेत्रात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी वाढली होती. यासंदर्भात आमदार विठ्ठलराव लंघे यांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून उन्हाळी आवर्तन सुरू करण्याची विनंती केली होती.

रब्बीचा शेवट आणि खरिपाच्या मशागतीच्या तोंडावर आज नेवासा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा झाले त्यातच आवर्तन सुटण्याची सुखद बातमी मिळाल्यानंतर नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे


या आवर्तनाचा लाभ राहुरी, नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील मुळा उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्राला होणार आहे. हे आवर्तन ४० दिवसांचे राहणार असून त्यासाठी ४.८ टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. अंदाजे ३० हजार हेक्टर क्षेत्राला या पाण्याचा फायदा होणार आहे.


शेतकऱ्यांच्या मागणीचे गांभीर्य ओळखून मंत्री विखे पाटील यांनी तातडीने निर्णय घेत आवर्तन सुरू करण्याचे आदेश दिल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आवर्तनाच्या कालावधीत पाण्याचा अपव्यय होणार नाही, शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचेल आणि योग्य नियोजन केले जाईल, याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आल्याचेही आमदार लंघे यांनी सांगितले.

उन्हाळ्याच्या तोंडावर सुटणाऱ्या या आवर्तनामुळे पिकांना जीवनदान मिळणार असून गावपातळीवरील नागरिकांच्या तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे.

चौकट —

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
32.2 ° C
32.2 °
32.2 °
43 %
5.9kmh
2 %
Fri
31 °
Sat
40 °
Sun
40 °
Mon
40 °
Tue
37 °

Most Popular

error: Content is protected !!