spot_img
spot_img
Homeक्राइमनेवाशात पहाटेची धडाकेबाज कारवाई! गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा;

नेवाशात पहाटेची धडाकेबाज कारवाई! गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा;

दोघे जेरबंद, ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त


नेवासा (प्रतिनिधी) – नेवासा शहरात पहाटेच्या सुमारास पोलिसांनी धडक कारवाई करत कथित गोमांस विक्रीच्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल १५५ किलो मांस, वजन काटे व इतर साहित्य असा सुमारे ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नेवासा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


पोलीस ठाणे नेवासा पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत नेवासा खुर्द येथील नाईकवाडी कुरेशी मोहल्ल्यात गोमांस विक्री सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. माहिती मिळताच ढिकले यांनी तात्काळ पोलीस पथक रवाना केले.
सकाळी साडेआठच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता अरबाज अबू चौधरी (वय २९, रा. नेवासा खुर्द) हा इसम मांस तोडून विक्री करताना आढळून आला. पंचांसमक्ष झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात मांस सापडले.


दरम्यान, शेजारील घराच्या वरच्या मजल्यावरही विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी दुसरी कारवाई करत आवेज आयाज शेख यास ताब्यात घेतले. तेथूनही मांसासह साहित्य जप्त करण्यात आले.


या संयुक्त कारवाईत १५५ किलो मांस (अंदाजे किंमत ४६,५०० रुपये), इलेक्ट्रिक वजन काटा, दुसरा काटा व सत्तूर असा एकूण ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.


या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल श्रीनाथ नवनाथ गवळी यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर ढिकले, पोलीस हवालदार अजय साठे, श्रीनाथ गवळी, नारायण डमाळे, राम वैद्य, गणेश जाधव व सुमित करंजकर यांच्या पथकाने केली.
या धडक कारवाईमुळे नेवासा शहरात दिवसभर चर्चांना उधाण आले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!