spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedज्ञानेश्वरांच्या पवित्र 'पैस' ला वंदन करत ८ जुलैला नेवासातून पालखीचे प्रस्थान; २२...

ज्ञानेश्वरांच्या पवित्र ‘पैस’ ला वंदन करत ८ जुलैला नेवासातून पालखीचे प्रस्थान; २२ जुलैला पंढरपुरात भक्तिमय सोहळ्याची सांगता

दिंडी सोहळ्यात नेवासा मिरजगाव आणि शिवतीर्थ मैदान टेंभुर्णी येथे होणार भव्य रिंगण सोहळा दिंड्या सहभागी होणार


नेवासा प्रतिनिधी :
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन स्मृती, ज्ञानेश्वरीच्या अखंड नामगजराचा स्पर्श आणि वारकरी भावविश्वाला भक्तीची नवचैतन्य देणारा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा यंदा बुधवार, दि. ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र नेवासा येथील ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी जन्मस्थान पैस खांब मंदिरातून प्रस्थान करणार आहे. नेवासा ते पंढरपूर असा हा भक्तिमय प्रवास विविध गावांमधून मार्गक्रमण करत दि. २२ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार असून, चंद्रभागेच्या तीरावर पादुका स्नान व समाज आरतीने या सोहळ्याची सांगता होणार आहे.


पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम मार्केट यार्ड, श्रीक्षेत्र नेवासा येथे राहणार असून, त्यानंतर दि. ९ जुलै रोजी वडाळा बहिरोबा बाजारतळ, १० जुलै रोजी धनगरवाडी, ११ जुलै रोजी राष्ट्रीय पाठशाळा मैदान, आनंदधाम रोड, अहिल्यानगर, १२ जुलै रोजी रुईछत्तीसी, १३ जुलै रोजी सीना शुगर मिल परिसर, १४ जुलै रोजी नागलवाडी-पीर फाटा परिसर, १५ जुलै रोजी चापडगाव बॉर्डर, १६ जुलै रोजी देवळाली, १७ जुलै रोजी शेलगाव, १८ जुलै रोजी कंदर, १९ जुलै रोजी वेणेगाव चौक परिसर, २० जुलै रोजी करकंब इरिगेशन कॉलनी, २१ जुलै रोजी टेंभुर्णी येथे भव्य गोल रिंगण, तर २२ जुलै रोजी पंढरपूर येथे चंद्रभागा वाळवंटात पादुका स्नान व समाज आरतीने या सोहळ्याची सांगता होणार आहे.


दरवर्षीप्रमाणे यंदाही या पालखी सोहळ्यात वारकरी, भाविक आणि दिंड्यांचा मोठा सहभाग अपेक्षित असून, नेवासा ते पंढरपूर हा प्रवास नामस्मरण, भजन, कीर्तन आणि भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. ज्ञानेश्वरीच्या जन्मभूमीतून निघणारा हा पालखी सोहळा वारकरी संप्रदायासाठी केवळ प्रवास नसून श्रद्धा, समर्पण आणि संत परंपरेचा उत्सव मानला जात


पालखी सोहळ्यात दिंडी सामाविष्ट करून नवीन क्रमांक घ्यायचा असल्यास संबंधितांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्रीक्षेत्र नेवासा येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या व्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार वेळापत्रकात किरकोळ बदल करण्याचा अधिकार पालखी सोहळा समितीकडे राहणार असल्याचेही संस्थानतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

पालखी सोहळा यशस्वीतेसाठी साठी ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे सह देविदास महाराज म्हस्के व सर्व विश्वस्त मंडळ मोठी भव्य तयारी करीत आहे

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.5 ° C
26.5 °
26.5 °
77 %
5.5kmh
100 %
Wed
27 °
Thu
30 °
Fri
30 °
Sat
31 °
Sun
31 °

Most Popular

error: Content is protected !!