spot_img
spot_img
Homeप्रशासनजागतिक युद्धजन्य परिस्थितीत गॅस ग्राहकांनी संयम व स्वयंशिस्त पाळावी – डॉ.लक्ष्मणराव इंगळे

जागतिक युद्धजन्य परिस्थितीत गॅस ग्राहकांनी संयम व स्वयंशिस्त पाळावी – डॉ.लक्ष्मणराव इंगळे

गॅस टाकी वितरणासाठी अनेक नवीन नियम लागू होत आहेत


नेवासा

सध्या जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम होत आहे. तरीही केंद्र सरकार व ऑईल कंपन्यांनी सामान्य घरगुती ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवत कोणत्याही परिस्थितीत घरातील चूल अखंड सुरू राहावी यासाठी उपाययोजना केल्या आहेत, असे गॅस वितरक प्रतिनिधी डॉक्टर लक्ष्मण राव इंगळे यांनी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत तसेच विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले

.
अनेक ग्राहक सिलेंडर मिळेल की नाही या भीतीपोटी २५ दिवस होताच सिलेंडर बुक करतात. वितरक त्यानुसार नियोजन करून डिलिव्हरीसाठी कर्मचारी पाठवतो; मात्र त्या वेळी सिलेंडर पूर्ण संपलेला नसल्याने कर्मचाऱ्याला परत जावे लागते. त्यामुळे त्याचे श्रम वाया जातात व दुसऱ्या गरजू ग्राहकाला वेळेवर गॅस मिळण्यात अडथळा निर्माण होतो. सर्वसाधारण कुटुंबाला साधारण ४० दिवसांनी गॅस लागत असल्यास ३५ दिवसांनी सिलेंडर बुक केल्यास वेळेवर गॅस मिळू शकतो.


ग्राहकांनी आपले KYC झाले आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. झाले नसेल तर त्वरित पूर्ण करावे. प्रत्येक डिलिव्हरी कर्मचाऱ्याच्या मोबाईलमध्ये ही सुविधा उपलब्ध असून अवघ्या काही मिनिटांत प्रक्रिया पूर्ण होते. तसेच ज्या व्यक्तीच्या नावावर गॅस कनेक्शन आहे ती व्यक्ती मृत झाल्यास ते कनेक्शन तातडीने घरातील इतर सदस्यांच्या नावावर वर्ग करणे आवश्यक आहे.


घरगुती गॅस सिलेंडरचा कोणत्याही परिस्थितीत व्यावसायिक वापर करू नये, तसेच कोणी कितीही पैसे देऊ केले तरी सिलेंडर व्यावसायिकाला देऊ नये. इंधन बचतीसाठी वितरकांकडून वेळोवेळी सांगितलेल्या उपाययोजनांचाही अवलंब करावा.
ग्राहकांनी संयम व स्वयंशिस्त पाळल्यास वितरकांना नियोजन करणे सोपे जाईल आणि सर्वांना वेळेवर गॅस मिळेल.

तसेच ग्राहक आपल्या नोंदणीकृत मोबाईलवरून ७७१०९५५५५५ या क्रमांकावर मिस कॉल देऊन सिलेंडर बुक करू शकतात. बिल तयार झाल्यानंतर ग्राहकाला सहा अंकी कोड पाठविला जातो. तो कोड डिलिव्हरी कर्मचाऱ्याला दिल्यानंतरच सिलेंडर दिला जातो. ग्राहक बाहेर जाणार असल्यास हा कोड घरातील दुसऱ्या सदस्याकडे देऊन ठेवावा, असेही इंगळे यांनी सांगितले.

▢ चौकट : गॅस ग्राहकांनी लक्षात ठेवाव्यात अशा बाबी
गरज नसताना सिलेंडर बुक करू नये; साधारण ३५ दिवसांनी बुक करणे योग्य
प्रत्येक ग्राहकाने आपले KYC पूर्ण केले आहे याची खात्री करावी
गॅस कनेक्शनधारकाचा मृत्यू झाल्यास कनेक्शन इतर सदस्याच्या नावावर करावे
घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर करू नये
इंधन बचतीसाठी वितरकांनी सुचविलेल्या उपायांचा अवलंब करावा
नोंदणीकृत मोबाईलवरून ७७१०९५५५५५ वर मिस कॉल देऊन सिलेंडर बुक करता येतो
डिलिव्हरीवेळी मिळालेला सहा अंकी कोड देणे आवश्यकआहे

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
32.2 ° C
32.2 °
32.2 °
43 %
5.9kmh
2 %
Fri
31 °
Sat
40 °
Sun
40 °
Mon
40 °
Tue
37 °

Most Popular

error: Content is protected !!