spot_img
spot_img
Homeअध्यात्मिकअंतरंगातून परिवर्तन हीच परमार्थाची खरी सफलता : ह.भ.प. अनिल महाराज पाटील

अंतरंगातून परिवर्तन हीच परमार्थाची खरी सफलता : ह.भ.प. अनिल महाराज पाटील

उद्धव महाराजांचा आश्रम पाहण्याचा योग आल्याने मनाला नवी ऊर्जा मिळाली.


नेवासा, प्रतिनिधी

– परमार्थामध्ये व्यवस्थेपेक्षा अवस्थेला अधिक महत्त्व असून मनुष्याच्या अंतरंगातून घडणारे परिवर्तन हीच परमार्थाची खरी सफलता आहे, असे प्रतिपादन वारकरीभूषण ह.भ.प. अनिल महाराज पाटील (बार्शी) यांनी केले.


ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम, सुरेगाव रस्ता, नेवासा बुद्रुक येथे ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सातव्या दिवसाचे कीर्तनपुष्प गुंफताना ते बोलत होते.
यावेळी महाराज म्हणाले, संतांविषयी आणि साधनेविषयी शुद्ध भाव प्रकट होणे आवश्यक आहे. एकवेळ चातुर्य कमी असले तरी चालेल, मात्र चरित्र शुद्ध असले पाहिजे. परिवर्तन स्वतःमध्ये झाले, तर जगामध्ये आपोआप परिवर्तन घडते. विज्ञान तात्पुरता बदल घडवते, तर अध्यात्म कायमस्वरूपी परिवर्तन घडवते. देव प्रत्येकाच्या जीवनात संधी देत असतो, त्या संधीचे सोने करता आले पाहिजे. अंतःकरण निर्मळ झाले की सर्वत्र देवाची अनुभूती येते.
परमार्थात काही मिळवायचे नसते, तर नको असलेल्या गोष्टींचा त्याग करून चांगल्याचा स्वीकार करायचा असतो. दानधर्मामुळे संपत्ती शुद्ध होते, असेही त्यांनी सांगितले.


उद्धवजी महाराजांच्या आश्रमाविषयी पूर्वी ऐकून होतो, मात्र प्रत्यक्ष हा आश्रम पाहण्याचा योग आल्याने मनाला नवी ऊर्जा मिळाली. आयोजन व नियोजनाच्या दृष्टीने उद्धवजी महाराजांचे उत्सव आदर्शवत असतात, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.


कीर्तनानंतर विविध प्रकारची सेवा देणाऱ्या दात्यांचा सन्मान करण्यात आला. गुरुवर्य बाबा ह.भ.प. महंत उद्धवजी महाराज मंडलिक, नेवासेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.
यावेळी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, विविध क्षेत्रांतील मान्यवर, तसेच भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आजच्या संतपूजन सेवेचे मानकरी बाळासाहेब गोर्डे (गोगलगाव, राहाता), रायभान काळे (पाथरे), एकनाथ लोखंडे (सोनई), सकाळच्या अल्पोपहारासाठी बाबासाहेब डौले (नेवासा बुद्रुक), दुपारच्या महाप्रसादासाठी सुदामराव तागड (घोडेगाव) व हरिश्चंद्र मते (हरीओम टाइल्स, नेवासा फाटा), तर सायंकाळच्या फराळप्रसादासाठी स्व. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील व कै. सिंधुताई विखे पाटील यांच्या स्मरणार्थ ध्रुव राजेंद्र विखे पाटील व परिवार, लोणी बुद्रुक यांनी सेवा दिली.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!